तरुण भारत

सलग दुसऱया दिवशी परतीच्या पावसाची रिपरिप

प्रतिनिधी/ बेळगाव

दुपारपर्यंत उकाडा आणि त्यानंतर पावसाची रिपरिप असे सध्या बेळगाव शहर व परिसरात वातावरण पहायला मिळत आहे. शनिवार नंतर सलग दुसऱया दिवशीही बेळगावमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती. ऑक्टोबर हिट नंतर परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरासोबत ग्रामीण भागातही रविवारी रात्री पर्यंत पाऊस झाला. यामुळे शेतीच्या कामांना मात्र ब्रेक लागला आहे.

Advertisements

शनिवारी विजांच्या कडकडाटासह दुपारनंतर शहरात पाऊस दाखल झाला. विजांचा कडकडाट व पडलेल्या फांद्यांमुळे शहरातील विजेचा खेळखंडोबा सुरू होता. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत शहराच्या बऱयाच भागात विजपुरवठा ठप्प झाला होता. रविवारी सकाळी उकाडा होता. दुपारनंतर मात्र पावसाचे ढग दाटून आले. जोराचा पाऊस नसला तरी रिमझिम पावसाने अनेक कामांमध्ये व्यत्यय आणला. दुपारपर्यंत  गर्दी असणाऱया बाजारात सायंकाळी मात्र शुकशुकाट होता. यामुळे व्यापारी वर्गाला रविवार असूनही फटका बसला.

ग्रामीण भागातही पावसाची हजेरी

बेळगाव शहरासोबतच ग्रामीण भागातही शनिवार बरोबरच रविवारीही पावसाने हजेरी लावली. दुपार नंतर पावसाला सुरूवात झाली. काही भागात रिमझीम तर काही भागात जोराचा पाऊस झाला. यामुळे शेतकरी वर्गाची पूरती तारांबळ उडाली. आधिच कोरोनामुळे पिचलेल्या शेतकऱयांना पावसामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

शेतीच्या कामांमध्ये व्यत्यय

ग्रामीण भागात सध्या बटाटे, रताळी तसेच सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. परंतु सततच्या पावसामुळे या कामामध्ये व्यत्यय येत आहे. तसेच ज्यांनी काढणी केली आहे त्या शेतकऱयांची आता ज्वारी व इतर पिके पेरण्यासाठी लगबग सुरू आहे. हा पाऊस वैरणीसाठी चांगला असला तरी शेतच्या कामामध्ये व्यत्यय आणणारा ठरत आहे.

Related Stories

42 पीडीओंवर 59 ग्रामपंचायतींचा कार्यभार

Amit Kulkarni

आजपासून बेळगावमधील पासपोर्ट सेवा केंद्र होणार सुरू

Patil_p

महाबळेश्वरनगर येथे गोवा बनावटीची दारू जप्त

Omkar B

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अधिकाऱयांची बैठक

Amit Kulkarni

राज्य स्क्वॅश स्पर्धेत दीप्शिका थोरात अजिंक्य

Amit Kulkarni

बैलूर परिसरात वळिवाची दमदार

Patil_p
error: Content is protected !!