तरुण भारत

मुंबई-बेंगळूर या मार्गावर क्लोन ट्रेन सुरू करा

सिटीझन कौन्सिलची नैऋत्य रेल्वेकडे मागणी, सणासाठी हॉलिडे स्पेशल गरजेची

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

गर्दीच्या मार्गांवर रेल्वे मंत्रालयाने 22 क्लोन टेन सुरू केल्या आहेत.  बेंगळुर ते मुंबई या मार्गावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. यामुळे या मार्गावर अनेक रेल्वे असूनही प्रवाशांना जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे बेंगळुर ते मुंबई या मार्गावर क्लोन ट्रेन सुरू करण्याची मागणी सीटीझन्स कौन्सिलने रविवारी नैऋत्य रेल्वेकडे केली.

 हुबळी येथील रेल्वे विभागीय अधिकारी के. एल. प्रभाकर राव यांनी रविवारी बेळगावला भेट दिली. यावेळी सीटीझन्स कौन्सिलच्या पदाधिकाऱयांनी त्यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. कर्नाटकातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा दसरा हा अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. या काळात बेंगळूर, म्हैसूर परिसरातून प्रवासी मोठय़ा संख्येने हुबळी – बेळगाव परिसरात दाखल होतात. त्याचबरोबर दिवाळीला मुंबई – पुणे येथील चाकरमानी आपापल्या गावी येतात. त्यामुळे या शहरांना हॉलिडे स्पेशल रेल्वे सुरू करणे गरजेचे आहे.

गोवा एक्स्प्रेसने 2019-20 या आर्थिक वर्षात तब्बल 42 कोटी रूपयांचा महसूल जमविला आहे. महसुलाच्या बाबतीत ही रेल्वे नैऋत्य रेल्वे विभागात सहाव्या स्थानी आहे. त्यामुळेच रेल्वे विभागाने या रेल्वे सोबत क्लोन रेल्वे सुरू केली आहे. याच धर्तीवर बेंगळूर ते मुंबई या मार्गावर क्लोन रेल्वे सुरू करणे गरजेचे आहे. यामुळे खासगी वाहनचालकांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे. 

हुबळी – मुंबई रेल्वे पुर्ववत करा

बेळगावमधून मुंबईला जाण्याकरीता हुबळी-मुंबई या रेल्वेला प्राधान्य देण्यात येते. परंतु लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ही रेल्वे अद्याप बंद आहे. याचा फायदा खासगी ट्रव्हल्स चालक उठवत आहेत. त्यामुळे हुबळी ते मुंबई ही रेल्वे पुन्हा पूर्ववत सुरू करून त्यामधील डब्यांची संख्या वाढवावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रारंभी दिवंगत केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सीटीझन कौन्सिलचे अध्यक्ष सतिश तेंडोलकर, सेवंतीलाल शाह, अरूण कुलकर्णी, जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष एस. सुरेश, बेळगावचे स्टेशन अधिक्षक एस. गिरीष, बेळगाव रेल्वे विभागाचे ट्रफिक इन्स्पेक्टर अनिलकुमार यासह इतर सदस्य उपस्थित होते.

Related Stories

येळ्ळूर गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी

Amit Kulkarni

बेळगाव बसस्थानकात समस्यांचा डोंगर

Amit Kulkarni

संशयित आरोपीच्या मृत्यूप्रकरणी

Patil_p

भाजप युवा मोर्चाच्यावतीने स्वच्छता अभियान

Amit Kulkarni

वेगळी वाट चोखाळणाऱया सुखदा बाडगी-हेर्लेकर

Patil_p

काम नसल्याने कारखाने बंद करण्याची वेळ

Patil_p
error: Content is protected !!