तरुण भारत

आगामी काळात जगातील सर्वात मोठी कामगारांची फळी भारतात?

नवीदिल्ली : आगामी काळात जगातील सर्वात मोठी कामगारांची फळी भारत उभारणार असल्याचे संकेत आहेत. यामध्ये जगातील प्रमुख देशांच्या बरोबरीत नायजेरिया, चीन आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतात मजबूत कामगार निर्मिती होणार  असल्याचा दावा हा लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासामधून करण्यात आला आहे. अभ्यासकांनी यामध्ये म्हटले आहे, की येत्या 2064 मध्ये जगातील सर्वाधिक कामगारांच्या यादीमध्येही 9.73 अब्जचा उच्चांक पार करणार असून त्यानंतर काही प्रमाणात या आकडेवारीत घसरण राहणार असल्याचे संकेत आहेत. दुसऱया बाजूला 2100 मध्ये जगाची कामगार संख्या ही 8.79 अब्ज राहणार आहे, असा अंदाज हा प्रामुख्याने फर्टिलिटी, मोर्टेलिटी आणि मायग्रेशनसह अन्य स्टॅटिस्टिकल मॉडेलचा आधार घेत ही माहिती स्पष्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून चीन आणि भारतामधील कामगारांची संख्या मोठय़ा प्रमाणात घसरत गेल्याचेही म्हटले आहे.  अभ्यासकांच्या माहितीनुसार वर्ष 2100 मध्ये भारत, नायजेरिया, चीन, अमेरिका आणि पाकिस्तान हे देश जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे देश म्हणून ओळखले जाणार आहेत. 2017 ते 2100 या काळात जपान, थायलंड आणि स्पेनसह अन्य 23 देशांची लोकसंख्या ही जवळपास 50 टक्क्यांनी कमी राहणार असल्याचे भाकित केले आहे.

Related Stories

देशामध्ये सोन्याची मागणी 70 टक्क्मयांनी घसरली

Patil_p

‘जिओ’ची जिओमार्ट वेबसाईट सुरू

Patil_p

कॅशलेश व्यवहारात व्हॉट्सअपची भूमिका सरस?

Patil_p

एसबीआय जनरल इन्शुरन्सकडून शगुन गिफ्ट इन पॉलिसी सादर

Patil_p

बीएस-6 वाहनांच्या नंबर प्लेटवर हिरवी पट्टी!

Patil_p

मोबाईल कंपन्यांचा चीनला झटका ?

Patil_p
error: Content is protected !!