तरुण भारत

सप्टेंबर तिमाहीत कृषी निर्यात 43.4 टक्क्यांनी वधारली

नवीदिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे विविध क्षेत्रं मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाली आहेत. यात वाहन, औद्योगिक, पर्यटन, हॉटेल्ससह अन्य क्षेत्रांचा समावेश राहिला आहे. परंतु दिलासादायक बाब म्हणजे देशातील कृषी क्षेत्र लॉकडाऊनच्या प्रारंभापासून तेजीत राहिल्याचे दिसून आले आहे. यामुळे  देशातील जीडीपीत काही प्रमाणात सुधारण्यास मदत झाल्याचे पहावयास मिळाले आहे. याचाच एक भाग म्हणून चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते सप्टेंबरमध्ये कृषी निर्यातीने 43.4 टक्क्यांची वृद्धी प्राप्त करत 53,626.6 कोटी रुपयाचा टप्पा पार केला आहे. अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने शनिवारी दिली आहे. सदरची निर्यात ही मागील आर्थिक वर्षातील समान कालावधीत 37,397.3 कोटी रुपयांवर राहिली होती. सप्टेंबर 2020 मध्ये कृषी निर्यात ही सप्टेंबर 2019 च्या तुलनेत 5,114 कोटी रुपयावरुन 81.7 टक्क्यांनी वधारुन 9,296 कोटीच्या घरात पोहोचली आहे. मागील काही दिवसांपासून शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्राकडून उभारण्यात येणाऱया उपाययोजनांचा हा परिणाम असल्याचे स्पष्टीकरण सरकारकडून यावेळी देण्यात आले आहे. एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत भुईमुग शेग 35 टक्के, साखर 104, गहू 206, बासमती तांदूळ 105 टक्के इतक्या प्रमाणात वरील उत्पादनांची निर्यात करण्यात आल्याची नेंद आहे.

Related Stories

फेसबुकची ऑनलाईन शॉपिंगची सुविधा

Patil_p

आयात पर्यायी धोरण प्रभावी ठरेल?

omkar B

नोकर भरतीत जूनमध्ये वाढ

Patil_p

जुलैमध्ये रत्ने-आभूषणांची निर्यात 38 टक्क्यांनी घटली

Patil_p

सेन्सेक्सची तेजीची घोडदौड सुरुच

Patil_p

रेस्टॉरन्ट उद्योगाची एकजूट ऑनलाईन फूट डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या तयारीत

Patil_p
error: Content is protected !!