तरुण भारत

स्वार्थासाठी पक्षांतरे करणाऱया गद्दारांना अद्दल घडवा

रुडाल्फ फर्नांडीस यांचे आवाहन, शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

स्वपक्षाकडे गद्दारी करून केवळ स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षांकडे हातमिळवणी करणाऱया काँग्रेस आमदारांना येत्या निवडणुकीत मतदारांनी अद्दल घडवावी, असे आवाहन सांताक्रुज मतदारसंघातील समाजकार्यकर्ते रुडाल्फ फर्नांडीस यांनी केले. सांताक्रुजच्या माजी आमदार तथा माजी मंत्री स्व. व्हिक्टोरिया फर्नांडिस यांचे ते सुपूत्र आहेत.

फर्नांडीस यांनी रविवारी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश केला. त्यानिमित्त आझाद मैदानावर खास सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते आमदार दिगंबर कामत, काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, वरद म्हार्दोळकर, जनार्दन भंडारी, विजय भिके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

स्वार्थासाठी पक्षांतरे करणाऱयांना धडा शिकविणे हे केवळ आणि केवळ मतदारांच्या हाती असते. अशा लोकांना अद्दल घडविल्याशिवाय भविष्यात राजकर्त्यांना जरब बसणार नाही. परिणामी पक्षांतरे चालूच राहतील, असे फर्नांडीस पुढे म्हणाले. आपण आपल्या आईप्रमाणेच सदैव गरीबांच्या मागे राहणार असे आश्वासनही त्यांनी दिले.

दिगंबर कामत यांची सरकारवर टीका

आपल्या भाषणात आमदार दिगंबर कामत यांनी विद्यमान भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजपच्या राज्यात आज गरीबांना वालीच राहिलेला नाही. कोरोना महामारीच्या काळात गोरगरीबांच्या गरजांकडे लक्ष देणे हे सरकारचे कर्तव्य होते, परंतु या सरकारने गरीबांच्या सर्व समस्या, अडचणींकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे, गरीब लोक या सरकारविरुद्ध आवाज सुद्धा उठवू शकत नाही, असे ते म्हणाले. अन्य मान्यवरांनीही विचार मांडले. स्व. व्हिक्टोरिया फर्नांडीस यांच्या तसबिरीस पुष्पहार घालून सभेची सुरुवात करण्यात आली. श्री. कामत यांनी पुष्पगुच्छ देऊन रुडाल्फ यांचे स्वागत केले व त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली. अमरनाथ पणजीकर यांनी सुत्रसंचालन केले. रुडाल्फ यांनीच आभारप्रदर्शन केले.

Related Stories

रियल इस्टेटसाठी ‘लॉकडाऊन’मधून थोडी शिथिलता द्यावी

Omkar B

भाजपने नाकारले तर आमच्याकडे या

Amit Kulkarni

मुख्यमंत्री बदलले तरी जनमन बदलणार नाही

Patil_p

कोविड हॉस्पिटलातून तिघांना डिस्चार्ज

tarunbharat

विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱयांची रॅली

Patil_p

पेडणे मतदारसंघातुन स्थानीक उमेदवार राजन कोरगावकर यांनाच उमेदवारी द्या ,धारगळमधील जेष्ठ भाजप कार्यकर्त्यांची पत्रकार परिषदेतून मागणी

Omkar B
error: Content is protected !!