तरुण भारत

अपूर्वा नेमळेकरचे पुनरागमन

झी युवावर लवकरच श्तुझं माझं जमतंय ही विनोदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांची लाडकी शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पम्मी या वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे आणि तिच्या सोबतच अभिनेता रोशन विचारे आणि अभिनेत्री आसावरी भानुदास या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला, ज्यात पम्मीची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि ही पम्मीदेखील आता प्रेक्षकांना तिच्या ग्लॅमरने घायाळ करणार आहे.

आता ही पम्मी शुभंकर आणि अश्विनी यांना तिच्या तालावर नाचवणार की काय असा प्रश्न प्रेक्षकांना प्रोमो पाहून पडला आहे. या प्रोमोला प्रेक्षक आणि चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. अपूर्वाच्या टेलिव्हिजनवरील पुनरागमनामुळे चाहते सुखावले आहेत. या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर म्हणाली, रात्रीस खेळ चाले ही मालिका खूप गाजली. लोकांनी शेवंता या व्यक्तिरेखेवर खूप प्रेम केलं आणि अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं. मालिका जरी संपली असली तरी प्रेक्षक शेवंताला अजूनही मिस करतात. हे बघून मला खूप आनंद होतो. पण शेवंताचा प्रवास त्या मालिकेसोबत संपला आणि पुन्हा एकदा मला टेलिव्हिजन या माध्यमाकडे वळण्याची ओढ लागली. म्हणून मी झी युवा वरील तुझं माझं जमतंय ही मालिका स्वीकारली आणि त्यात मी साकारत असलेली पम्मी ही व्यक्तिरेखा देखील भन्नाट आहे. पम्मीला पाहताना प्रेक्षक शेवंताला पूर्णपणे विसरून जातील आणि पम्मीच्या प्रेमात पडतील. असे ती म्हणाली.

Related Stories

दख्खनचा राजा ज्योतिबा लवकरच येणार भेटीला

Patil_p

पॅकअप होऊच नये असे वाटले : विदुला चौघुले

Patil_p

शेवंताची भूमिका अंगात भिनली आहे : अपूर्वा नेमळेकर

Patil_p

मिथुन चक्रवर्तीच्या मुलासह पत्नीवर गुन्हा दाखल

pradnya p

‘लता भगवान करे’चा ट्रेलर प्रदर्शित

prashant_c

या आठवडय़ात

Patil_p
error: Content is protected !!