तरुण भारत

कोरोना बळींचा आकडा ५०७ पार

प्रतिनिधी
पणजी

राज्यात कोरोनाने ५00 बळींचा टप्पा ओलांडला असून बळींचा एकूण आकडा ५०७ झाला आहे. आतापर्यंतच्या कोरोना रूग्णांची एकूण संख्या ३८३६६, झाली असून त्यातील ३३२०३ जण बरे झाले आहेत. सध्या 4656 एवढे संशयित रूग्ण असून ते विविध हॉस्पिटल, कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
जूनमध्ये गोव्यात कोरोनाचा पहिला बळी गेला होता. त्यानंतर बळींचे प्रमाण हळूहळू वाढत गेले. गेल्या चार-साडेचार माहिन्यात ५00 बळींचा आकडा पार झाला आहे. म्हणजेच माहिन्यात सरासरी १00 बळी गेल्याचे समोर येत आहे. सध्या दर दिवशी कोरोनाचे बळी जात असून मागील तीन माहिन्यात तर बळी गेला नाहि असा एकहि दिवस गेला नाहि. दररोज एकेरी संख्येने बळी जात असून कधीतरी मध्येच दुहेरी संख्येचे १0 किंवा त्यापेक्षा जास्त बळी जात आहेत.
रूग्ण पॉझिटिव्ह मिळण्याचे प्रमाणहि कायम असून प्रतिदिन ५00 च्या आसपास नवे कोरोनाबाधित सापडतात तर त्याच प्रमाणात किंवा त्यापेक्षा काहि कमी प्रमाणात कोरोनातून बरे होत आहेत. बळी, कोरोनाबाधित सातत्याने वाढत असून ते कमी होण्याची किंवा थांबण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहित. प्रतिदिन चाचण्यांचे प्रमाण कमीगेल्या काहि दिवसात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत असले तरी त्यामागे दुसरे कारण आहे, ते म्हणजे कोरोनाच्या तपासणीचे प्रमाण प्रतिदिन कमी होत आहे. अगोदर सुमारे २000 किंवा त्यापेक्षा जास्त जणांची कोरोना चाचणी होत होती. आता ती संख्या प्रतिदिन कमी झाली असून १५00 किंवा त्यापेक्षा कमी लोकांची चाचणी होत आहे. पॉझिटिव्ह रूग्ण कमी मिळाले तरी कोरोनाचे बळी मात्र कमी होताना दिसत नाहित.

Related Stories

घोरपडांची शिकारप्रकरणी सहा जण ताब्यात

Patil_p

बार्देशातील पालक शिक्षकांचा विद्यालये, कॉलेज सुरू करण्यास विरोध

omkar B

आता संयुक्तपणे लढणार

omkar B

दररोज शाकाहारी जेवणाबरोबरच योगाभ्यास

Patil_p

वाडे वास्कोतील तळय़ाच्या देखभाल प्रश्नावरून पुन्हा वाद

Patil_p

मांगोरहिल ‘कंटेनमेंट’मध्ये 15 दिवसांची वाढ

Patil_p
error: Content is protected !!