तरुण भारत

सातारा : कोरोनासंसर्ग वाढीसह मृत्यूदराचा आलेख खाली

जिल्हय़ात 10 बाधितांचा मृत्यू, एकूण कोरोनामुक्त 33,533,
सातारा तालुका 90 बाधित, कराड फक्त 20 नवे बाधित

कोरेगाव 36, फलटण 19 बाधित, माण तालुक्यात फक्त 1 बाधित,
जंबो हॉस्पिटलच्या कामास आरंभ

प्रतिनिधी / सातारा

ऑक्टोबर महिन्याच्या आरंभापासून बाधित वाढण्याचा वेग मंदावला असून गेल्या दोन तीन दिवसात 200 च्या पटीत वाढ होत आहे. यामध्ये फक्त सातारा शहर व तालुक्यात 90 नवे बाधित सापडले असून सातारा हॉटस्पॉट ठरलाय. तर दुसरीकडे कराडमध्ये बाधित वाढीचा आलेख खाली घसरला असून रविवारी रात्रीच्या अहवालात फक्त 20 नवे बाधित समोर आलेत. तर माण तालुक्यात फक्त 1 नवीन बाधित समोर आलाय. मृत्यूदर खाली घसरु लागली असून जिल्हय़ात 10 बाधितांचा उपचार सुरु असताना मृत्यू झालाय.

जंबो हॉस्पिटलच्या कामास आरंभ
साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सुरु करण्यात आलेल्या जंबो हॉस्पिटलने परिसराचे रुपडे पालटून गेलेय. या हॉस्पिटलच्या कामास आरंभ झाला असून पहिल्याच दिवशी तिथे सुयोग्य नियोजनाचा अभाव आढळला तो रुग्ण भरती करुन घेण्यामध्ये. मात्र हे स्पेशल कोविड हॉस्पिटल फक्त गंभीर स्थितीतील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आहे. सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना इतर रुग्णालयत तसेच कोरोना केअर सेंटरमध्येच उपचार होणार आहेत. मात्र दुपारी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी हॉस्पिटलकडून रेफर करण्यात रुग्ण रुग्णवाहिकेतून आणण्यात आले होते. मात्र त्यांना प्रवेश न दिल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, जिह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 223 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 10 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

रविवारी रात्रीच्या अहवालामध्ये :
सातारा तालुका 90 बाधित
सातारा 8, संगमनगर 1, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 1, शनिवार पेठ 2, व्यंकटपूरा पेठ 1, शाहूनगर 3, शाहुपुरी 3, करंजे 3, कोडोली 1, मोळाचा ओढा 4, रविवार पेठ 3, पळशी 1, राऊतवाडी 1, लिंब गोवे 1, पोवईनाका 3, गजवदन गार्डन सातारा 1, बसाप्पा पेठ 1, सदरबझार 4, कारंडवाडी 2, कोंडवे 1, नागठाणे 3, विक्रांतनगर 1, गोडोली 3, राधिका रोड सातारा 1, संभाजीनगर 1, मल्हार पेठ सातारा 1, पाटखळ 1, काशिळ 1, सासपडे 1, चिमणपुरा पेठ 1, यादोगोपाळ पेठ सातारा 1, देगाव रोड 1, गोळीबार मैदान सातारा 1, खेड 3, अंबवडे वाघोली 1, शेरेवाडी 1, तामजाईनगर 2, वायझरे 1, खामकरवाडी 1, सोनगाव 3, विकासनगर 1, देगाव फाटा 1, लिंब 5, रामनगर 1, परळी 2, बारवकरनगर 1.

कोरेगाव तालुका 36 बाधित
कोरेगाव 3, सुभाषनगर 1, खामकरवाडी 1, तारगाव 4, गुजरवाडी 1, पिंपोडे बु 1, नागझरी 2, रोकडेश्वर गल्ली कोरेगाव 1, रहिमतपूर 4, खेड नांदगिरी 2, वाठार किरोली 2, सासुर्वे 2, पिंपरी 2, पाडळी स्टेशन 1, जळगाव 1, कुमठे 1, एकसळ 5, चंचळी 1, देऊर 1.

कराड तालुका 20 बाधित
कराड 2, मलकापूर 2, टेंभू 1, आगाशिवनगर 1, कापिल 1, येणके 1, महारुगडेवाडी 1, येणपे 1, वडगाव हवेली 1, मलकापूर 2, कार्वे 1, आगाशिवनगर 1, शेणोली 1, वाठार 1, घोणशी 1, विरावडे 1, येणके 1.

फलटण तालुका 19 बाधित
शुक्रवार पेठ 3, बुधवार पेठ 1, मलटण 2, फरांदवाडी 1, जाधवाडी 2, लक्ष्मीनगर 2, साखरवाडी 1, मुरुम 1, धुळदेव 1, कोळकी 1, शेरेवाडी 4.

वाई तालुका 19 बाधित
वाई 2, रविवार पेठ 1, गणपती आळी 1, धोम 1, फुलेनगर 1, धोम कॉलनी 1, गंगापुरी 1, भुईंज 4, आसले 2, बावधन 1, किकली 1, परखंदी 1, कवठे 1, सोनगिरवाडी 1, वहागाव.

खटाव तालुका 13 बाधित
खटाव 1, धोंडेवाडी 1, फडतरवाडी 4, गणेशवाडी 1, खातगुण 4, निमसोड 2.

जावली तालुका 6 बाधित : सोमर्डी 1, शिंदेवाडी 1, कुडाळ 1, गावडी 2, वयगाव 1,

पाटण तालुका 4 बाधित : आचरेवाडी 3, बाबडे 1.

खंडाळा तालुका 2 बाधित : लोणंद 1, खंडाळा 1,

महाबळेश्वर तालुका 3 बाधित : महाबळेश्वर 1, तापोळा 1, डॉ. साबणे रोड महाबळेश्वर 1.

माण तालुक्यातील : दहिवडी 1.

इतर : 2, फडतरवाडी 1, खर्शी 1, शेंदूरजणे 1.

जिल्हय़ातील 10 बाधितांचा मृत्यू
रुग्णालय, सातारा येथे उपचार घेतलेल्या रहिमतपूर ता. कोरेगाव 60 वर्षीय पुरुष, वेण्णानगर ता. सातारा 83 वर्षीय महिला, नेर ता. खटाव येथील 55 वर्षीय महिला, पाल. ता. कराड येथील 83 वर्षीय महिला, निनाम पाडळी ता. सातारा येथील 73 पुरुष, भोसरे ता. खटाव 50 वर्षीय पुरुष, वाघजाईवाडी ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय महिला. तसेच जिह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये कोरेगाव येथील 88 वर्षीय पुरुष, खेड नांदगिरी ता. कोरेगाव 70 वर्षीय पुरुष तर रात्री उशिरा कळविलेले कळमवाडी ता. वाळवा जि. सांगली 55 वर्षीय पुरुष अशा 10 एकूण कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 1,63,114
एकूण बाधित 41,834
एकूण कोरोनामुक्त 33,533
मृत्यू 1,374
उपचारार्थ रुग्ण 6,927

Related Stories

आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढे येऊन नावे नोंदवावीत

triratna

मला जाणता राजा म्हणा असं मी म्हणालो नाही : शरद पवार

prashant_c

कोविड बाधित ७० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू

triratna

कारवाई पोलिस अधिक्षकांच्या गाडीवरसुद्धा

Patil_p

रुग्णालयातून पळालेला बाधित खटावात सापडला

Patil_p

राष्ट्रवादीचा १० जून रोजी ऑनलाईन नोकरी महोत्सव

triratna
error: Content is protected !!