तरुण भारत

उत्तरप्रदेशात 31,277 शिक्षकांना मिळणार नियुक्तीपत्र

ऑनलाईन टीम / लखनऊ : 

उत्तर प्रदेशातील 69 हजार पदांच्या शिक्षक भरती प्रक्रियेतील 31,277 शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या शिक्षकांना 16 ऑक्टोबरला नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. 

दरम्यान, या सहाय्यक शिक्षकभरतीवरून अनेक वाद निर्माण झाले होते. अर्ज भरताना चुका केलेल्या काही उमेदवारांनी हायकोर्टात स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. शिक्षक भरतीच्या अर्जात चुका करणाऱ्या उमेदवारांना दिलासा देत उच्च न्यायालयाने मूलभूत शिक्षण परिषदेला नियमानुसार उमेदवारांच्या प्रतिनिधित्वाबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. या याचिकांवर न्यायमूर्ती पंकज भाटिया यांनी सुनावणी घेतली होती.

न्यायालयाच्या निर्णयानंतर शिक्षक भरतीच्या यादीला दुजोरा देताना उत्तर प्रदेशचे शिक्षणमंत्री सतीश द्विवेदी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 31,277 शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आज जाहीर झालेल्या उमेदवारांची भरती प्रक्रिया 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर न्यायालयाच्या निर्णयानुसार उर्वरित भरती केली जाईल. 

Related Stories

निमलष्करी दलाची विदेशी उत्पादनांवर बंदी

Patil_p

महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ; गेल्या 24 तासात 14,888 नवे रुग्ण

pradnya p

देशात मागील 24 तासात 94,372 नवे कोरोना रुग्ण; 1114 मृत्यू

datta jadhav

कोल्हापूर जिल्ह्यात आठ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर

triratna

चौथ्या शनिवारी सुटी न घेणाऱया सरकारी कर्मचाऱयांना 15 दिवस प्रासंगिक रजा

Patil_p

एनडीटीव्ही प्रवर्तक प्रणोय रॉय यांना दिलासा नाहीच

Patil_p
error: Content is protected !!