तरुण भारत

…तर सरकारला स्वस्थ बसू देणार नाही : चंद्रकांत पाटील

  • महिला अत्याचाराविरोधात पुणे शहर बीजेपीच्यावतीने आंदोलन


ऑनलाईन टीम / पुणे : 


महाराष्ट्रात महाविकास आघाड सत्तेत आल्यापासून महिला, युवती आणि बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विनयभंग, बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि खुनांच्या घटना घडत आहेत. मात्र मुख्यमंत्री, गृहमंत्री या अत्याचारांची गंभीरपणे दखल घेत नाहीत. महिलांना राज्यात सुरक्षित वातावरण मिळाले नाही तर सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.

Advertisements


पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला अत्याचाराविरोधात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्या नेतृत्वाखालील ‘आक्रोश’आंदोलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.


ते पुढे म्हणाले, ‘हाथरसची घटना क्लेशदायकच आहे, पण महाराष्ट्रात महिलांवर होणार्‍या अन्याचाराबाबत सरकारने डोळे झाकले आहेत. सरकार महाराष्ट्राला लुटायला बसले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत असंवेदनशील आहे. महिलांवरील गुन्ह्याच्या तपासाबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वे जारी केली, मग राज्य सरकार कायदा करण्यात मागे का आहे.


शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत. गृहमंत्री फोटो सेशनमध्ये व्यस्त आहेत. महिलांवर न्याय द्यायला सरकारला वेळ नाही. खरं तर सरकार स्थापन करण्याचा कौल भाजपला होता. परंतु शिवसेनेने गद्दारी केली. हे तत्वहीन सरकार आहे. सरकारला बदल्या करण्यात स्वारस्य आहे. परंतु महिलांच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्य नाही. या सरकारच्या विरोधात आज शहरात आठ ठिकाणी आंदोलन करण्यात आले. 


या आंदोलनात माजी मंत्री अनिल बोंडे, आमदार मुक्ता टिळक, सुनील कांबळे, माजी मंंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे सह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

Related Stories

मोदी सरकार इंग्रज राजवटीपेक्षाही जुलमी, अत्याचारी – नाना पटोले

Abhijeet Shinde

सुप्रिया सुळेंनी नोंदवली 10 वीज उपकेंद्रांची ऑनलाईन मागणी

Rohan_P

अनिल देशमुखांच्या कंपन्यांनी घेतलेल्या कर्जाची ईडीकडून तपासणी

Abhijeet Shinde

राजू शेट्टींचा पत्ता कट होणार ?; मंत्री जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Abhijeet Shinde

कलादिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरण : पुण्यात एकाला अटक, चौघांचा शोध सुरु

Abhijeet Shinde

महा एनजीओ फेडरेशनतर्फे महाराष्ट्रातील 96 संस्थाना मदत

Rohan_P
error: Content is protected !!