तरुण भारत

कोरोनानंतरच्या उपचारावर होणार जनजागृती

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हÎात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या घटून 20 टक्क्यांखाली आली आहे. पण कोरोनामुक्त झालेल्या काही रूग्णांत अद्यापी काही लक्षणे दिसून येत आहेत. यासंदर्भात कोरोनानंतरचे उपचार यावर जनजागृती करण्याचा आणि कोरोना उपचार केंद्र सीपीआरमध्ये सुरू करण्याचा निर्णय सीपीआरमधील टास्क फोर्सच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Advertisements

जिल्हÎात मार्चमध्ये सीपीआर हॉस्पिटल कोरोना हॉस्पिटल झाले. तेव्हापासून आजपर्यत सीपीआरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी सीपीआर टास्क फोर्स समिती स्थापन केली होती.  सद्यस्थितीत या समितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मस्के, डॉ. बनसोडे, डॉ. मिसाळ, डॉ. सैबन्नावर, डॉ. बडे आदींचा समावेश आहे. कोरोना रूग्णांची संख्या घटल्यानंतर पुढील उपाययोजना काय, यावर सोमवारी सीपीआर हॉस्पिटलमध्ये टास्क फोर्स समितीची बैठक झाली.

बैठकीत कोरोनामुक्त झाल्यानंतर काही रूग्णांत कोरोनाची पुन्हा लक्षणे दिसत आहेत. अशा रूग्णांची माहिती घेणे, कोरोनामुक्तांना डिसचार्ज घेतल्यानंतर काय दक्षता घ्यायची, याची माहिती देणे आणि कोरोनानंतरचे उपचार अन् दक्षता यासंदर्भात जनजागृती अभियान राबवण्यावर चर्चा झाली. कोरोना साथ संपेपर्यत सीपीआरमध्ये कोरोना उपचार केंद्र सुरू ठेवणे, स्वतंत्र बाहÎरूग्ण विभाग सुरू करणे आणि जिल्हÎातील केअर सेंटरमधील स्टाफला सीपीआरमध्ये प्रशिक्षण देण्यावर चर्चा झाली. प्रशिक्षण आणि जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंदकांत मस्के यांनी दिली.

Related Stories

कोल्हापूर शहरातील 6 गुंड जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : हाळोलीत हत्तीचा धुमाकूळ

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३५ हजारांवर

Abhijeet Shinde

वेतवडे म्हैस चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक

Abhijeet Shinde

पानसरे हत्या प्रकरण : अंदूरे व कुरणेच्या जामीन अर्जावर २१ ऑगस्टला सुनावणी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : अपघातात जखमी झालेल्या अध्यापिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!