तरुण भारत

चीनमध्ये डॉ.कोटणीस यांच्या स्मृतींना उजाळा

110 वी जयंती साजरी : दुसऱया महायुद्धादरम्यान चीनमधील जनसेवा ठरली होती प्रशंसनीय

वृत्तसंस्था / बीजिंग

Advertisements

भारतीय डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त चीनमध्ये त्यांच्या स्मृतींना रविवारी उजाळा देण्यात आला आहे. चायनीज पीपल्स असोसिएशन फॉर प्रेंडशिप विथ फॉरेन कंट्रीजने (सीपीएफएफसी) यानिमित्त ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात पेकिंग विद्यापीठाच्या सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीजचे संचालकही सामील झाले.

डॉ. कोटणीस मूळचे महाराष्ट्रातील रहिवासी होते. त्यांनी दुसऱया महायुद्धाच्या काळात चीनमध्ये केलेली जनसेवा अद्वितीय मानली जाते. केवळ 32 वय असताना त्यांचे निधन झाले होते. कोटणीस यांना चीनमध्ये के. डिहुआ या नावाने ओळखले जाते.

1938 साली चीनमध्ये

1938 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने चीनच्या मदतीसाठी 5 डॉक्टरांचे पथक पाठविले होते आणि यात कोटणीस यांचा समावेश होता. ऑनलाईन कार्यक्रमात भारतातील सद्यकाळात डॉ. कोटणीस यांचे विचार समजून घेण्याची गरज असल्याचे उद्गार सीपीएफएफसीचे अध्यक्ष लिन सोंगटियान यांनी काढले आहेत.

चीनचे चांगले मित्र

डॉ. कोटणीस यांनी क्रांतीच्या अवघडकाळात चीनला मदत केली. त्यांच्या कामाचे चीनचे नेते माओ जेडोंग यांनीही कौतुक केले होते. चीनचे चांगले मित्र आणि एका आंतरराष्ट्रीय लढवय्याचे आज स्मरण करत आहोत. डॉ. कोटणीस यांच्या विचारांना पुढे नेण्याचे आवाहन चीन आणि भारताच्या तरुणाईला करत असल्याचे लिन यांनी यावेळी म्हटले आहे.

चीनमध्ये अनेक स्मारके

चीनच्या शिजियाझुआंग आणि हुबेई प्रांतात डॉ. कोटणीस यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. शिजियाझुआंगच्या डिहुआ मेडिकल सायन्स सेकंड्री स्पेशलाइज्ड स्कुलला त्यांचेच नाव देण्यात आले आहे. कोटणीस यांनी चीनच्या गुओ किंगलाम यांच्याशी विवाह केला होता. 2012 मध्ये किंगलाम यांचे निधन झाले होते. चालू वर्षाच्या सप्टेंबरमध्ये शिजियाझुआंगमध्ये डॉ. कोटणीस यांचा कांस्य पुतळा बसविला आहे.

Related Stories

पाकिस्तानला धडा शिकविणार अमेरिका

Patil_p

अमेरिकेत आणखी एका कृष्णवर्णीयाच्या मृत्यूवरून वाद

Patil_p

पहिल्यांदाच अंतराळात आइस्क्रीम पार्टी

Patil_p

कोरोनापेक्षा अधिक घातक असणार भविष्यातील महामारी

Patil_p

कमी उंचीच्या लोकांचा देश

Amit Kulkarni

उत्तर आफ्रिकेतील अल कायद्याचा प्रमुख ठार, फ्रान्सची कारवाई

datta jadhav
error: Content is protected !!