तरुण भारत

वीज वितरण कंपन्यांची थकबाकी 37 टक्क्यांनी वाढली

वीज क्षेत्र चांगलेच तणावात

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

वीज उत्पादन कंपन्यांची वीज वितरणातील थकबाकी ऑगस्ट 2020 मध्ये जवळपास 37 टक्क्यांनी वाढून 1.33 लाख कोटी रुपयांवर आली आहे. सदरच्या आकडेवारीतून वीज क्षेत्रातील वाढत्या तणावाचे चित्र पहावयास मिळत आहे.

विजेची खरेदी-विक्री ही पारदर्शकतेत आणण्यासाठी विविध टप्प्यावर प्रयत्न केले जात असून या कार्यासाठी प्राप्ति पोर्टलचाही आधार घेतला गेला आहे. ऑगस्ट 2019 मध्ये थकबाकी ही 96,963 कोटी रुपयांची राहिली होती. सदर पोर्टलचा प्रारंभ हा मे 2018 मध्ये करण्यात आला आहे.

ऑगस्ट 2020 मध्ये एकूण थकबाकीची रक्कम 1,20,439 कोटी रुपये होती. वीज वितरण कंपन्यांनी 45 दिवसांनंतरही वीज उत्पादकांची थकीत रक्कम दिलेली नाही. नंतर थकीत रक्कमेवर व्याज आकारणी केली जाते.

 कारण वीज उत्पादन कंपन्या या वीज वितरण कंपन्यांना रक्कम जमा करण्यास 45 दिवसांचा कालावधी देते. अन्यथा थकीत रक्कमेवर व्याज आकारणी केली जाते.

वीज उत्पादन कंपन्यांना दिलासा?

वीज उत्पादन कंपन्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राने एक ऑगस्ट 2019 पासून एक पेमेंट सुरक्षा नियम लागू केला आहे. केंद्राने कोविड 19 च्या कारणामुळे व लॉकडाऊनच्या घोषणेमुळे वीज वितरण कंपन्यांना सवलत दिलेली आहे.

Related Stories

‘इंडियन ऑईल’ने उत्पादन क्षमता वाढविली

Patil_p

इपीएफओकडे जुलैमध्ये 8.45 लाख नवीन नावनोंदणी

Patil_p

कोळसा उत्पादन घटले

Patil_p

थेट प्रत्यक्ष कर संकलन 9.45 लाख कोटीवर

Patil_p

‘एलजी’ आता एआय सेवा विकसित करण्याच्या तयारीत

Patil_p

ट्वीटर महसूल वाढविणार

Patil_p
error: Content is protected !!