तरुण भारत

माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही : उध्दव ठाकरे

  • मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना उत्तर 


ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्र राज्यातील मंदिर खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून देणारे पत्र लिहिले. राज्यपालांनी पाठवलेल्या या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.  

Advertisements


“माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लगावला आहे.


दरम्यान, राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले आहेत. या पत्रा सोबतच मुख्यमंत्र्यांना हिंदुत्त्वाची आठवणही करुन दिली. बार-रेस्टॉरंट सुरु झाले, देवच कुलुप बंद का? तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का? मंदिरं सुरु करु नये असे दैवी संकेत मिळतात का? असे सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केले आहेत.

  • उध्दव ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्राला दिलेले उत्तर :  

मुख्यमंत्री आपल्या पत्रात लिहितात की, “महोदय आपले दिनांक 12।10। 20 रोजीचे प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरुर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सूचना देणे, जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी आणि उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल.

महोदय, आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्त्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही. Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्त्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही. इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे.

आपण म्हणता गेल्या 3 महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली. त्यातील 3 पत्रे आपण सोबत जोडली आहेत. ही तीनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत असून सर्व काळजी घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल ही खात्री मी आपल्याला देतो.

जय हिंद, जय महाराष्ट्रआपला नम्र -उद्धव ठाकरे

Related Stories

सीमाभाग महाराष्ट्राचाच; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला पुरावा

Abhijeet Shinde

लॉक डाऊनच्या काळात धोनी, अश्विनकडून ऑनलाईन प्रशिक्षण

prashant_c

महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे 6,753 नवे रुग्ण; 167 मृत्यू

Rohan_P

गोकुळ, जिल्हा बँक संचालक मंडळास 3 महिन्यांची मुदतवाढ

Abhijeet Shinde

पेठ वडगाव : माजी नगराध्यक्ष विश्रांत माने यांचे निधन

Abhijeet Shinde

चिंताजनक : बेंगळूरच्या एकाच इमारतीतील 103 जणांना कोरोनाची बाधा

Rohan_P
error: Content is protected !!