तरुण भारत

कोल्हापूर : पत्रकार हा समाजातील घडामोडींचे वास्तव मांडणारा योध्दा : चंद्रकांत दंडवते

केनवडे येथे अनंतशांती संस्थेमार्फत पत्रकारांचा सन्मान

वार्ताहर / व्हनाळी

Advertisements

पत्रकार समाज मनाचा आरसा आहे. समाज परिवर्तना बरोबरच सामाजिक बांधिलकेतून चांगल्या वाईत घटनांचे वास्तव चित्रण आपल्या लेखनीतून समाजा समोर मांडताना वेळेचे भान व कर्तव्याची जाण ठेवून गेले सहा महीने कोरोना महामारीच्या काळातही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता वाडी वस्ती बरोबरच रुग्णालयात जाऊन रूग्णा बरोबरच उपेक्षितांना आधार देत केलेल्या अनमोल कार्याबद्दल “अनंत शांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे” संस्थापक भगवान गुरव यांच्या मार्गदर्शना खाली केलेला सत्कार हा पत्रकार बांधवाना उभारी व उत्साह वाढवणारा असल्याचे प्रतिपादन केनवडेचे मा. उपसरपंच चंद्रकांत दंडवते यांनी केले.

केनवडे ता. कागल येथे अनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था,कोल्हापुर,कसबा वाळवे यांचे वतीने आयोजित, कोरोना महामारी कालावधित गेले सहा महिने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस कोरोना रुग्णा बरोबरच इतरांना आधार देत समाजातील वास्तव मांडून प्रबोधन करणाऱ्या पत्रकार बांधवांना *”कोरोना योध्दा२०२०”* पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजीराव पाटील होते.

स्वागत पत्रकार प्रकाश कारंडे यांनी केले. प्रास्ताविकात भगवानराव गुरव यांनी पत्रकार बंधुंचे समाज परिवर्तना बरोबरच प्रबोधनात करत असलेल्या कार्याचा गौरव करून या *”कोरोना योध्दांचा”* सत्कार करण्याची संस्थेला संधी मिळाल्याने समाधान व्यक्त केले.

सागर लोहार म्हणाले, पत्रकारांचा सत्कार हा कोणीही लोकप्रतीनीधिनी न करता समाजातील उपेक्षित बांधवांना विविध माध्यमाव्दारे मदतीचा हात देत पाठबळ देणाऱ्या अनंत शांती संस्थेचे संस्थापक भगवानराव गुरव करत असल्याबद्दल पत्रकार बांधवांचे मार्फत त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

यावेळी मान्यवरांचे हस्ते पत्रकार, प्रकाश कारंडे, उपसंपादक राजन वर्धन, रमेश पाटील, सिद्राम मांडरेकर, एन. एस.पाटील, सागर लोहार, तानाजी पाटील, राजेंद्र काशीद, सुभाष भोसले, जे.के.कांबळे आदी पत्रकारांना “कोरोना योध्दासमाजरक्षक २०२०” पुरस्कार सन्मान पत्र व शिल्ड देवून गौरवण्यात आले.
यावेळी वस्ताद प्रमोद पाटील, विठ्ठल खर्डे, राजेंद्र पाटील, सागर माने आदी उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत शिरोलीत बारा हजार लोकांचा सर्वे पूर्ण

Abhijeet Shinde

बालिंगे पूलानजिक ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर- ट्रॉली उलटली

Sumit Tambekar

कार खरेदीच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक प्रकरणी एकास अटक

Abhijeet Shinde

कोल्हापूर : लक्षतीर्थमध्ये बालविवाह रोखला

Abhijeet Shinde

कोल्हापूर : औषध विक्रेते,पत्रकारांना कोविड योद्धयांचा दर्जा देणार

Abhijeet Shinde

बांधकामचे कर्मचारी पाच वाजताच गायब

Abhijeet Shinde
error: Content is protected !!