तरुण भारत

बिहार : 15 बंडखोर नेत्यांची जनता दलातून हकालपट्टी

ऑनलाईन टीम / पटना : 

विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या 15 नेत्यांची जनता दल (यू) पक्षाने सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये एक विद्यमान आमदार, काही माजी आमदार आणि माजी मंत्र्यांचा समावेश आहे. 

Advertisements

दंडनसिंह यादव, रामेश्वर पासवान, भगवानसिंह कुशवाह, कांचन कुमारी गुप्ता, सुमित सिंग, रणविजय सिंह, प्रमोद सिंह सूर्यवंशी, अरुण कुमार, तजम्मूल खान, अमरेश चौधरी, शिवशंकर चौधरी, सिंधू पासवान, करतार सिंग, राकेश रंजन आणि मुंगेरी पासवान अशी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांची नावे आहेत. 

दरम्यान, सोमवारी भाजपनेही बिहारमधील नऊ भाजप नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. राजेंद्र सिंग, रामेश्वर चौरसिया, उषा विद्यार्थी, रवींद्र यादव, श्वेता सिंग, इंदू कश्यप, अनिल कुमार, मृणाल शेखर, अजय प्रताप अशी भाजपातून हकालपट्टी करण्यात आलेल्या बंडखोर नेत्यांची नावे आहेत. या नेत्यांनी एनडीए उमेदवारांविरोधात अर्ज दाखल केले आहेत. 

Related Stories

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून दिल्ली प्रदूषणावर चर्चा; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं

Sumit Tambekar

खेडय़ांमध्ये लस पुरवठय़ासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Patil_p

गांजाला ड्रग्जच्या यादीतून हटवले!

datta jadhav

थकीत ‘डीए’संबंधी अद्याप निर्णय नाही

Patil_p

”सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदींनी केली प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी”

Abhijeet Shinde

देशात 85 लाख रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात

datta jadhav
error: Content is protected !!