तरुण भारत

खून करुन सोने, चांदी लांबविणाऱ्याला अटक

अथणी पोलिसांची कारवाई, 77 लाखांचे सोने जप्त

 प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

सोन्याचा व चांदिचा व्यवसाय करणाऱया पाटगाव (ता. मिरज, जि. सांगली) येथील एकाचा खून करण्यात आला होता. खून करुन त्याच्याकडील 77 लाख रुपये किंमतीचा ऐवज लांबविला होता. अथणी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून अथणी येथील एकाला अटक केली आहे.

नवनाथ बापुसाहेब बाबर (वय 30, रा. जमगी, ता. अथणी) असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे. पाटगाव (ता. मिरज) येथील सागर पाटील आणि संतोष मारुती पाटील हे उत्तर प्रदेश येथील मोगलसराई जिह्यातील अंबू गावामध्ये सोने आणि चांदी वितळून त्याची बिस्कीटे तयार करत होती. त्यानंतर त्याची विक्री देखील करत होते.

सागर आणि संतोष दि. 27 सप्टेंबर 2020 रोजी उत्तर प्रदेशकडे गेले होते. यावेळी अचानक सागर हा गायब झाला. आरोपी नवनाथ बाबर याने त्याचे अपहरण केले. त्यानंतर तेथील एका नदीकाठाला नेवून त्याचा खून केला. त्यानंतर त्याच्याकडील एक किलो 451 ग्रॅम सोने आणि 3 किलो 638 ग्रॅम चांदी पळवून नेली. या घटनेनंतर संतोष याने सागर याची पत्नी प्रगती पाटील यांना फोन करुन माहिती दिली.

प्रगती पाटील यांनी अथणी पोलीस स्थानकात नवनाथ बाबर याच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या दृष्टिने चौकशी करुन नवनाथ बाबर याला अटक केली आणि त्याच्याकडून 77 लाखांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी,डीवायएसपी गिरीश एस. व्ही. सीपीआय शंकरगौडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार हाडकार आणि एम. डी. घोरी यांनी ही कारवाई केली आहे. याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Related Stories

काही भागातील बससेवा अद्यापही ठप्पच

Amit Kulkarni

तिहेरी अपघातात खणगावचा तरुण ठार

Patil_p

काकती सिद्धेश्वर मंदिर परिसरातदेवतांच्या भग्न प्रतिमांचे संकलन

Amit Kulkarni

सिद्धकला युथ क्लबतर्फे जिजामाता-स्वामी विवेकानंद जयंती

Amit Kulkarni

कचरावाहू वाहन ताफ्यात ई-ऑटोटिप्पर दाखल

Omkar B

बेळगाव ते गोडचीनमल्की सायकल मोहीम

Patil_p
error: Content is protected !!