तरुण भारत

सोलापूर शहरातील दुकाने रात्री 9 पर्यंत सुरु, तर सिनेमागृहे बंदच

-मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांचे आदेश

सोलापूर : प्रतिनिधी

दुकानांना सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंतच परवानगी होती. चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयुक्तांना निवेदन देऊन वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. परिणामी व्यापाऱ्यांना सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सिनेमागृहे बंदच ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी दिले.

शहरातील शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स आता नऊ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये. नागरिक व व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, ज्या ग्राहकांकडे मास्क नाही, त्यांना दुकानातील वस्तू विक्री करु नये, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत.

शहरातील कोरोनाची स्थिती आता सर्वांच्या सहकार्यातून सुधारू लागली आहे. आगामी काळात शहर कोरोनामुक्त करण्याच्या हेतूने व्यापाऱ्यांसह सोलापुकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त पी. शिवशंकर यांनी यावेळी केले.

Advertisements

Related Stories

शहीद सुनिल काळे पंचतत्वात विलीन

Abhijeet Shinde

सोलापुरात कोरोना बाधितांचा आलेख वाढताच, आज नवे 14 रुग्ण

Abhijeet Shinde

उपमहापौर काळे अखेर पोलिसांच्या ताब्यात

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये 608 रुग्ण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

वीज कनेक्शन तोड मोहीम तात्काळ थांबवावी : करमाळा भाजपाची मागणी

Abhijeet Shinde

पिंपरीत नदीपात्र बुजविण्याचा प्रकार

prashant_c
error: Content is protected !!