तरुण भारत

महापालिका आयुक्तांनी घेतला पथदिपांचा आढावा

प्रतिनिधी / बेळगाव

शहरातील पथदिपांबाबत तक्रारी वाढत आहेत. तरीदेखील कंत्राटदारांकडून याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी शहराच्या विविध भागात पाहणी करून पथदिपांच्या तक्रारीची माहिती घेतली. नादुरुस्त असलेले पथदीप तातडीने दुरुस्त करण्याची सूचना अधिकाऱयांसह कंत्राटदाराला केली.

स्मार्ट सिटी योजनेतील विकासकामांमुळे सर्वत्र खोदाईचे काम सुरू आहे. अशातच प्रत्येक रस्त्यावरील पथदीप बंद असल्याने निम्मे शहर अंधाराच्या विळख्यात सापडले आहे. पथदिपांबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही दुरुस्ती करण्याची तसदी कंत्राटदारांनी घेतली नाही. शहर आणि उपनगरांतील बहुतांश पथदीप बंद अवस्थेत आहेत. मात्र, बंद दिव्यांच्या देखभालिकरिता कंत्राटदाराला लाखो रुपये बिल अदा करण्यात येत आहे. बंद पथदिपांच्या तक्रारी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्याकडे करण्यात आल्या. त्यामुळे महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी मंगळवारी शहराच्या विविध भागात फेरफटका मारून पथदिपांचा आढावा घेतला. अनेक ठिकाणी पथदीप बंद असल्याचे निदर्शनास आले. विविध चौकात लावण्यात आलेले हायमास्टदेखील नादुरुस्त आहेत. त्यामुळे सदर हायमास्ट आणि पथदीप तातडीने दुरुस्त करण्याची सूचना पथदीप देखभाल विभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंते तसेच कंत्राटदाराला केली. दुरुस्तीचे काम पूर्ण करून त्याबाबतची माहिती देण्याची सूचनादेखील आयुक्तांनी केली. त्यामुळे सहय़ाद्रीनगर, सदाशिवनगर अशा विविध भागातील पथदिपांच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी तातडीने हाती घेण्यात आले. शहराच्या प्रमुख रस्त्यांवरील पथदीपही बंद आहेत. त्यामुळे या पथदिपांची दुरुस्ती करण्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. या तक्रारीचे निवारण महापालिका आयुक्तांनी पाहणी करून करावे, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. 

Related Stories

कंग्राळ गल्लीत साकारला विजापूरचा भव्य किल्ला

Patil_p

कोरोना काळातही बेळगावसाठी अट्टापीट्टा सुरूच

Patil_p

ग्रामीण भागात अघोषित वीजकपात

Amit Kulkarni

नार्वेकर गल्लीतील एन.जी.बॉईजकडून 25 फुटी ओल्डमॅन

Omkar B

सेंद्रिय कृषी उत्पादन प्रदर्शन आजपासून

Patil_p

किल्ले राजगड ते रायगड पदभ्रमंती यशस्वी

Patil_p
error: Content is protected !!