तरुण भारत

प्रत्येक चित्रांमध्ये जाणवतोय जिवंतपणा!

खादरवाडी येथील कृष्णा गोरल रेखाटतोय हुबेहूब चित्रे

बेळगाव प्रतिनिधी

Advertisements

ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील कृष्णा गोरल याला शाळेपासूनच चित्रकलेची आवड आहे. यातूनच त्याने आपली कला जोपासली. शाळेत असल्यापासून चित्रकला विषय शिक्षिका नेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णाने अनेक चित्रे रेखाटली. तसेच तालुका व राज्यस्तरीय पातळीवर चित्रकला स्पर्धेत अनेक बक्षिसेही मिळविली. याबरोबरच फळय़ावर चित्रे काढून त्याने आपला छंद जोपासला. सध्या भिंतीवर अनेक चित्रे काढून रंगकाम सुरू केले आहे. त्याने आपल्या कलेतूनच अर्थार्जनाचा मार्ग शोधला आहे.

   खादरवाडी गणपत गल्ली येथील कृष्णा महादेव गोरल हा युवक 2011 पासून भिंतीवर चित्रे काढतो. सध्या त्याने मंडोळी गावातील बसवाण गल्ली येथील भरमा भोसले यांच्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांचे हुबेहूब चित्र रेखाटले आहे. त्याने हातात पेंटिंग ब्रश घेतला की त्याच्या हातून आपोआपच चित्र घडत जाते आणि त्याच्या प्रत्येक चित्रांमध्ये जिवंतपणा जाणवतो.

  भिंतीवर चित्र काढण्यासाठी त्याने अक्रोलिक कलर आणि ऑईल कलरचा वापर केला आहे. सात बाय सहा या आकारात त्याने महाराजांचे चित्र रेखाटले असून या चित्रात कॉलीग्राफी म्हणजे लेख सुद्धा आहे. हे चित्र त्याला बनविण्यासाठी अडीच ते तीन दिवसांचा कालावधी लागला आहे. प्रथम पेन्सिलच्या साहाय्याने भिंतीवर चित्र रेखाटून त्याला रंगकाम करून कॉम्प्रेसर मशीनच्या साहाय्याने शेडींगचे काम केले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात महाराजाच आपल्यासमोर आहेत, असा भास भोसले कुटुंबीयांना होत आहे. तसेच कृष्णाने रेखाटलेले चित्र पाहण्यासाठी मंडोळी गावातील नागरिक गर्दी करत आहेत.

 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कला सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध होणे गरजेचे

 मोठय़ा भावाच्या प्रेरणेने मी चित्र काढण्यास सुरुवात केली. यामध्ये घरच्यांची मला मोलाची साथ लाभली. त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. सुरुवातीला गावांमधील मंदिरांचे कळस, शाळांच्याभोवती चित्रे काढली आहेत. तसेच आता लोकांच्या आवडीनुसार ते जे सांगतील तसे पेंटिंग भिंतीवर करून देत असल्यामुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये भरपूर कला आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यक्तींना व्यासपीठ उपलब्ध होण्याची गरज आहे. ‘तरुण भारत’ने माझ्या चित्रकलेची दखल घेऊन तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचविले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे कृष्णा गोरल म्हणाला.

Related Stories

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधाचा तुटवडा

Patil_p

तुरमुरीतील ‘त्या’ पाण्याचा निचरा न केल्यास रास्तारोको

Amit Kulkarni

मुचंडी येथे तरुणाला मारहाण

Patil_p

भाजीपाल्यांचे दर सर्वसामान्यांना चटका देणारे

Patil_p

कोरोनाच्या धास्तीत कांदा आला तेजीत

Patil_p

काकती सिद्धेश्वर देवस्थानचा इंगळय़ांचा सोहळा अभूतपूर्व

Amit Kulkarni
error: Content is protected !!