तरुण भारत

मलप्रभा साखर कारखान्याची आज पंचवार्षिक निवडणूक

खानापूर / प्रतिनिधी

विविध कारणामुळे आर्थिक डबघाईला आलेल्या एम. के. हुबळी येथील मलप्रभा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक आज बुधवार दि. 14 रोजी होत आहे. या निवडणुकीत एकूण 15 संचालकांच्या जागा असून त्यामध्ये 37 उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच उमेदवार नवखे आहेत. तर कारखान्याच्या विद्यमान संचालकानी निवडणुकीकडे पूर्णत: पाठ फिरविली आहे. या निवडणुकीत खरी लढत माजी केंद्रीय मंत्री व रयत नेते बाबागौडा पाटील यांचे चिरंजीव प्रकाशगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलविरुद्ध निधर्मी जनता दलाचे अल्पसंख्याक विभागाचे राज्याध्यक्ष नासीर बागवान यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलमध्ये होणार आहे. दोन्ही पॅनेलचे प्रत्येकी पंधराही उमेदवार उभे असून 7 उमेदवार अपक्ष आहेत.

Advertisements

मलप्रभा सहकारी साखर कारखाना संपूर्ण राज्यातील एक अग्रेसर सहकारी साखर कारखाना ओळखला जात होता. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात प्रामुख्यांने बैलहोंगल, खानापूर, कित्तूर, बेळगाव आदी तालुक्यांचा प्रामुख्यांने समावेश आहे. या कारखान्याचा आतापर्यंतचा इतिहास पाहता सुरुवातीच्या काळात संस्थापक चेअरमन कै. मल्लापण्णा होसमणी यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ अधिकारावर होते. तर यानंतरच्या काळात माजी विधानपरिषद सदस्य बोळशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल अल्पकाळ सत्तेवर होते. तर कारखान्यात बरीचवर्षे माजी आमदार कै. बी. डी. इनामदार यानंतर माजी मंत्री डी. बी. इनामदार तसेच रयत संघ यांच्यामध्ये नेहमी अधूनमधून सत्ता पालट होत होती. या कारखान्यात निवडून आलेल्या काही संचालकानी राज्य पातळीवरील राजकारणातही आपला प्रभाव टाकला होता. त्यामध्ये प्रामुख्यांने संस्थापक चेअरमन कै. मल्लापण्णा होसमणी, माजी आमदार बी. एम. सानिकोप, माजी आमदार कै. बी. डी. इनामदार, माजी मंत्री डी. बी. इनामदार तसेच माजी आमदार कै. अशोक पाटील, माजी विधानपरिषद सदस्य कै. बोळशेट्टी तसेच माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. एक वेळ संपूर्ण राज्यात ऊस उत्पादकांना उच्चांकी दर देणारा साखर कारखाना म्हणून मलप्रभा कारखान्याची ओळख होती. पण गेल्या काही वर्षापासून कारखाना विविध कारणामुळे आर्थिक डबघाईला जावू लागला. तरीदेखील मध्यंतरीच्या काळात माजी मंत्री डी. बी. इनामदार यांनी कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. पण त्यांचे प्रयत्नही तोडके पडले.

गेल्या पाचवर्षात कारखान्याची आर्थिक परिस्थिती तर एकदमच कोलमंडली. कारखान्यानी 2017-18 तसेच 2019-20 सालातील जवळपास ऊस उत्पादकांचे 22 कोटी रुपये बिल देणे बाकी आहे. तसेच गेल्या सात महिन्यात कारखान्याने कामगारांचा पगारही दिला नाही. तसेच अद्याप काही वाहतुकदारांचे बिलही देणे बाकी आहे. एकूण जवळपास कारखान्याकडून 25 कोटी रुपये देणे बाकी असून सध्या एकही पोते साखर शिल्लक नसल्याचे समजते. या सर्व परिस्थितीमुळे कारखान्याच्या विद्यमान संचालकानी तर निवडणुकीकडे पूर्णत: पाठ फिरविली आहे. कारखान्याच्या अशा परिस्थितीत कुणीही निवडणूक लढवण्यास पुढे येणार नाही, असे वाटत असतानाच माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील यांचे सुपूत्र प्रकाशगौडा पाटील यांनी पुढाकार घेऊन रयत सहकारी अभिवृद्धी नावाने पॅनेलची रचना करुन आपले 15 उमेदवार उभे केले आहेत.

नव्या कायद्यानुसार 1603 सभासद मतदानासाठी पात्र

रयत सहकारी अभिवृद्धी पॅनेलला निजद नेते नासीर बागवान यांनीदेखील 15 उमेदवार उभे करुन त्या पॅनेलसमोर आव्हान उभे केले आहे. तर सातजण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. एकूण 15 जागापैकी अ वर्गासाठी सामान्य गटात 9, महिला गटात दोन, ओबीसी अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीसाठी प्रत्येकी 1 तसेच बिगर शेतकरी गटासाठी 1 अशा एकूण संचालकांच्या 15 जागा आहेत. तसे पाहिल्यास कारखान्याच्या अ वर्ग सभासदांची संख्या 15 हजारच्या घरात आहे. पण सहकार खात्याच्या नव्या कायदय़ानुसार केवळ 1603 सभासद मतदानासाठी पात्र ठरले आहेत. दोन्ही पॅनेलच्या प्रमुखांनी आपली सत्ता आल्यास कारखान्याच्या विकासाबरोबरच तातडीने थकित बिलांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे बुधवारी होणाऱया निवडणुकीत नेमके कोणते पॅनेल बाजी मारणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.

निवडणुकीतील प्रकाशगौडा पाटील यांच्या पॅनेलमध्ये अ वर्गातून अडव्याप्पा गडण्णावर, चन्नगौडा पाटील, सिद्धलिंगाप्पा नागलापूर, रामनगौडा पाटील, शिवमूर्ती पुजार, अशोक हुचगौडर, श्ऱीशैल्य तुरमुरी, पर्वतगौडा पाटील, अडव्याप्पा गोणी,  अनुसूचित जाती गटातून अनंत तळवार, अनुसूचित जमाती गटातून यल्लाप्पा हाळसगी तर महिला गटातून शांता तुरमुरी, मंजुळा हट्टीवळी तसेच ब वर्गातून संगमेश वाली निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर नासीर बागवान यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधून अशोक भेंडीगीरी, अशोक यमकणमर्डी, लक्ष्मण यम्मी, जोतिबा हैबती, बसवराज पुंडी, बसवराज भेंडीगीरी, मंजुनाथ पाटील, सिद्धाप्पा गोरपण्णावर, शंकरगौडा पाटील, भरतेश सेबन्नावर, अनुसूचित जाती गटातून सांवत किरगण्णावर, अनुसूचित जमाती गटातून संजू हुबळाप्पण्णावर तसेच महिला गटातून लक्ष्मी अरळीकट्टी, मिनाक्षी नळगळी तसेच ब वर्गातून स्वत: नासीर बागवान निवडणूक लढवत आहेत.

Related Stories

इनरव्हीलतर्फे अवयवदान विषयावर स्पर्धा

Patil_p

विनाकारण बाहेर फिरणाऱया वाहनांच्या संख्येत वाढ

Amit Kulkarni

वीज-पाणी पुरवठय़ाविना गाळे भाडेतत्त्वावर

Amit Kulkarni

गुंजी माउलीदेवी मंदिर दसरोत्सवापूर्वी पूर्णत्वाकडे

Amit Kulkarni

हिंदवाडी-आनंदवाडी कॉर्नर येथे पाण्याची गळती

Amit Kulkarni

कडोलीच्या अभिजित पाटीलचे के-सेट परीक्षेत यश

Patil_p
error: Content is protected !!