तरुण भारत

रितू फोगटची लढत कंबोडियाच्या पोव्हशी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

या महिन्याच्या अखेरीस द मॅट्रीक्सतर्फे आयोजित केलेल्या जागतिक दर्जाच्या सहा कुस्ती लढतीतील एक लढत भारताची महिला मल्ल रितू फोगट (52.2 कि.) आणि कंबोडियाची नोयु श्रेय पोव्ह यांच्यात सिंगापूरमध्ये होणार आहे.

Advertisements

सिंगापूरच्या इनडोअर स्टेडियममध्ये 30 ऑक्टोबरला ही लढत होणार असून या लढतीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. सदर माहिती वन चॅम्पियनशीप इनसाईड द मॅट्रिक्सतर्फे देण्यात आली. मॅट्रीक्सतर्फे विविध वजन गटातील चार विश्व लढती आयोजित केल्या आहेत. मिडलवेट बेल्टसाठी म्यानमारच्या विद्यमान विजेत्या सेंग आणि हॉलंडच्या रिडेर यांच्यात लढत होईल. त्याचप्रमाणे लाईटवेट गटात सिंगापूरची ली आणि माल्डोव्हाची लॅपिक्यूस तसेच फेदरवेट गटात व्हिएतनामचा नेग्युयेन आणि अमेरिकेचा ली यांच्यात लढत होणार आहे.

Related Stories

सनरायजर्स-आरसीबी एलिमिनेटर लढत आज

Patil_p

आयसीसी बहुमानासाठी अश्विन, रूट, मायर्सला नामांकन

Patil_p

मानांकनात जपानच्या ओसाकाची घसरण

Patil_p

जर्मनीतील १३० लोकांचे खेडे, तेथेही रंगला नीरजच्या ‘गोल्ड’चा जल्लोष!

Patil_p

पोनप्पा-रेड्डी दुहेरीत उपविजेते

Patil_p

यजमान इंग्लंडचा 35 वर्षांनंतर आयर्लंडवर पहिला विजय

Omkar B
error: Content is protected !!