तरुण भारत

देशात मागील 24 तासात 63,509 नवे कोरोना रुग्ण; 730 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 63 हजार 509 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 730 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 72 लाख 39 हजार 390 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 10 हजार 586 एवढी आहे. 

सध्या देशात 8 लाख 26 हजार 876 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 63 लाख 01 हजार 928 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

देशात 9 कोटी कोरोना चाचण्या

देशात आतापर्यंत 9 कोटी 90 हजार 122 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 11 लाख 45 हजार 015 कोरोना चाचण्या मंगळवारी एका दिवसात करण्यात आल्या.

Related Stories

लॉकडाऊनमध्ये मासेमारीला केंद्र सरकारची परवानगी

prashant_c

कोरोना युद्धात बेसावधपणा नकोच !

Patil_p

वाराणसीत आयएसआय हस्तक जेरबंद

Patil_p

तरुणांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून सुरुवातीलाच रोखावे !

Patil_p

सर्वपक्षीय बैठकीत ‘शांतते’वर चर्चा

Patil_p

उत्तराखंड सरकारकडून खाजगी लॅब, रुग्णालयात कोरोना चाचण्यांसाठीचे दर निश्चित

pradnya p
error: Content is protected !!