तरुण भारत

विप्रोचा तिमाही नफा 3.4 टक्क्यांनी घसरला

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

आयटी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची दिग्गज कंपनी विप्रोचा सप्टेंबर तिमाहीमधील नफा 3.40 टक्क्यांनी घसरला आहे. याच्यासह कंपनीने 9,500 कोटींच्या पुर्नखरेदीच्या योजनेला मंजुरी दिली आहे. घसरणीसह एकत्रित तिमाही नफा  2,465.7 कोटी रुपयांवर राहिला आहे, अशी माहिती कंपनीने शेअर बाजाराला मंगळवारी दिली.

Advertisements

पुर्नखरेदीमध्ये कंपनी प्रत्येक समभागाचा भाव 400 रुपये निश्चित करण्याचा अंदाज आहे. कंपनीला आर्थिक वर्ष 2019-20 च्या दुसऱया तिमाहीत निव्वळ नफा 2,552.7 कोटी रुपयांवर राहिला होता. तसेच विप्रोचे उत्पन्न चालू आर्थिक  वर्षात जुलै ते सप्टेंबर तिमाहीत 15,114.5 कोटी रुपयाव्ंार स्थिरावले आहे. बायबॅक योजनेअंतर्गत प्रति इक्विटी 400 रुपयाच्या भावासह 23.75 कोटी रुपयांचे समभाग पुर्नखरेदी करण्यात येणार आहेत. विप्रोला आयटी सेवा व्यवसायातून डिसेंबर तिमाहीअखेर 2022-2062 दशलक्ष डॉलर्सचा महसूल प्राप्त होण्याचा अंदाज  आहे.

व्यवसाय वाढीसाठी पोषक वातावरणः डेलपोर्टे, सीईओ

कंपनीकरीता तिमाहीत वाढलेला महसूल उपकारक ठरला असून व्यवसाय विस्तार व रोखीवतेसाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याचे स्पष्टीकरण विप्रोचे सीईओ थीअरी डेलपोर्टे यांनी केले आहे. येणाऱया काळात उपलब्ध होणाऱया संधींवर कंपनी लक्ष केंद्रीत असणार असून गेल्या तिमाहीत व्यवसायांना गती प्राप्त झाली असून त्याचे सकारात्मक परिणाम पुढील काळात दिसणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

जग्वार लँड रोव्हरच्या वाहन विक्रीत वाढ

Patil_p

अंतिम सत्रही घसरणीसह बंद

Patil_p

फ्लिपकार्टची मॅक्स फॅशनशी भागीदारी

Omkar B

एलआयसीकडून आनंदा मोबाईल ऍपचे सादरीकरण

Patil_p

बँक-आयटी कंपन्यांच्या समभाग विक्रीने सेन्सेक्स तेजीत

Patil_p

गुगल क्लाऊड इंडियाचे एमडी बेदी

Patil_p
error: Content is protected !!