तरुण भारत

बांगलादेशचा चीनला झटका

बांगलादेशने चीनला मोठा झटका देत त्याच्या कोरोना लसीच्या चाचणीकरता रक्कम गुंतविण्यास नकार दिला आहे. बांगलादेशात सिनोवॅक बायोटेक या चिनी कंपनीकडून निर्मित लसीची चाचणी आता रखडली आहे. चिनी कंपनीची अर्थसहाय्याची मागणी बांगलादेशच्या आरोग्य मंत्रालयाने फेटाळली आहे. सरकार जोवर निधी पुरवत नाही, तोवर चाचणीत विलंब होत राहणार असल्याचे सिनोवॅक बायोटेकने बांगलादेश सरकारला कळविले होते. परंतु एका करारानुसार सिनोवॅक बायोटेकलाच चाचणीचा खर्च करावा लागणार आहे. 4,200 स्वयंसेवकांवर चाचणी करण्यासाठी सुमारे 60 कोटी बांगलादेशी टका इतका खर्च येणार आहे.

Related Stories

एच-1बी संबंधी अमेरिकेत नवे विधेयक

Patil_p

जागतिक स्पर्धात्मकतेत भारत 43 व्या स्थानी

Patil_p

जगभरात 2.10 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

सहारा वाळवंटापासून युरोपमध्ये पोहोचणारे फुलपाखरू

Patil_p

अमेरिकेत 7 जूनपर्यंत संचारबंदी

datta jadhav

चीन : ब्राझीलमधून आयात केलेल्या चिकनमध्ये आढळले कोरोनाचे विषाणू

datta jadhav
error: Content is protected !!