तरुण भारत

रत्नागिरी : दापोली विधानसभा राष्ट्रवादी मतदार क्षेत्र सरचिटणीसपदी अमित कदम

प्रतिनिधी / खेड

दापोली विधानसभा राष्ट्रवादीच्या मतदार क्षेत्र सरचिटणीसपदी अमित कदम यांची निवड करण्यात आली आहे. दापोली येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी तसे नियुक्ती पत्र दिले.

Advertisements

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या सरचिटणीस पदापासून राजकीय वाटचालीस सुरूवात करणाऱ्या अमित कदम यांनी युवकांना एकसंघ करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बळकट करण्यावर भर दिला. या पदाच्या माध्यमातून केलेल्या योगदानाची दखल घेत येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष असून राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदीही कार्यरत आहेत.

दापोली, मंडणगड, खेड तालुक्यात राष्ट्रवादीला आणखी बळकट करण्यासाठी त्यांच्याकडे मतदार क्षेत्राच्या सरचिटणीस पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. या निवडीबद्दल खासदार तटकरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, रायगड जिल्हा प्रभारी अजय बिरवटकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

ऍपेक्स’ची डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल मान्यता रद्द

Patil_p

धक्कादायक : राज्यात आतापर्यंत 714 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण

triratna

गावातील रस्त्यांसाठीही मुबलक भरपाई मिळावी

NIKHIL_N

‘राजमुद्रा’वर हल्ला करणाऱयांना कठोर शिक्षा द्या

Patil_p

कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 56 वर

NIKHIL_N

विमानकोंडीमुळे रत्नागिरीचा अथर्व अडकला सिंगापूरात…!

tarunbharat
error: Content is protected !!