तरुण भारत

नऊशे जणांना 250 कोटींचा गंडा घालणारी महिला गजाआड

दक्षिण गोव्यातील रिसॉर्टमधून केली अटक

प्रतिनिधी/ मडगाव

Advertisements

ऍप आधारित ‘हॅलो टॅक्सी’ कंपनीत गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून दक्षिण गोव्यातील 900 जणांना 250 कोटीं रूपयांचा गंडा घातल्याप्रकरणी दक्षिण गोव्यातून एका 47 वषीय महिलेला अटक केल्याची माहिती सह पोलिस आयुक्त ओ. पी. मिश्रा यांनी दिली आहे.

 याबाबत 2019 मध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार, ही महिला आणि तिचे व्यावसायिक भागीदार सरोज महापात्रा, राजेश महतो, सुंदर भाटी आणि हरिश भाटी यांनी लोकांना तिच्या कंपनीतील गुंतवणुकीच्या मासिक आधारावर 200 टक्क्मयांपर्यंत जास्त व्याज देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाला बळी पडून दक्षिण गोव्यातील 900 लोकांनी 250 कोटींची गुंतवणूक हॅलो टॅक्सी कंपनीत केली होती. मात्र आश्वासनानुसार परतावा करण्यात आला नव्हता.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हॅलो टॅक्सी फर्ममध्ये 900 हून अधिक लोकांनी गुंतवणूक केली आहे. कंपनीचे चार सहकारी संचालक आहेत आणि त्यांनी या महिलेसह 250 कोटी रुपयांसह पलायन केले होते.

 वारंवार बदलली कार्यालये

 सुरुवातीला गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी चांगला परतावा दिला, पण नंतर मोठी रक्कम जमा करून परतावा देण्याचे थांबविले. आरोपी वारंवार त्यांची कार्यालयेही बदलत राहिले. सुरुवातीला, कंपनीचे कार्यालय गाझियाबाद येथे होते आणि काही महिन्यांनंतर हे कार्यालय पाटपरगंज औद्योगिक क्षेत्रात आणि नंतर सेक्टर-16, रोहिणी येथे हलविण्यात आले. कंपनीच्या बँक स्टेटमेन्टची छाननी केली गेली आणि त्यातील 3,27,48,495 रुपये असलेली बँक खाती गोठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 ही संपूर्ण कारवाई दिल्लीतून करण्यात आलेली आहे. स्थानिक पोलिसांना या प्रकरणाची कोणतीच कल्पना लागू दिलेली नाही.

साडेतीन कोटीच्या साठ नव्या गाडय़ा जप्त

 ही महिला व तिच्या साथीदारांनी नोएडा येथे फसवणूक केलेल्या रकमेमधून खरेदी केलेल्या साडेतीन कोटींच्या साठ नव्या गाडय़ा जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्या महिलेची ओळख उघड केलेली नाही, तिला दक्षिण गोव्यातील एका रिसॉर्टमधून पकडण्यात आले असले तरी ती गोमंतकीय नाही. या कंपनीतील चार संचालकांपैकी एक असलेल्या राजेश महतो याला 23 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. अन्य साथीदारांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

कोरोनाचे बळी ठरलेल्यांना होते जुने आजार

Omkar B

रेल्वे दुपदरीकरण करताना दूधसागर पर्यटनाचा विचार व्हावा

Patil_p

संजीवनी कारखाना बंद केलेला नाही

Patil_p

काँग्रेसच्या फुटीर आमदारांना मत मांडण्यास दोन आठवडय़ांची मुदत

Patil_p

माजी आमदार, शिक्षणमंत्री विनायक नाईक यांचे निधन

Amit Kulkarni

भाजपात प्रवेश केल्याने काणकोणचा विकास करता आला

Omkar B
error: Content is protected !!