तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 8 जणांचा मृत्यू

पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 47 हजारांवर

पॉझिटिव्ह रूग्ण 110, कोरोनामुक्त 477, कोरोना 8 मृत्यू

Advertisements

आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण : 47 हजार 058

आजपर्यतचे कोरोनामुक्त झालेले रूग्ण : 41 हजार 757

सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण : 4 हजार 724

आजपर्यतचे एकूण कोरोना बळी : 1577

प्रतिनिधी/कोल्हापूर

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात कोरोनाने 8 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व मृत्यू शासकीय हॉस्पिटल्समध्ये झाले. गेल्या 24 तासांत 477 जण कोरोनामुक्त ़ााले तर 110 नवे रूग्ण समोर आले. सद्यस्थितीत कोरोनामुक्तांची संख्या 41 हजार 757 झाली आहे. पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 47 हजारांवर पोहोचली आहे. दिवसभरात 423 संशयितांची तपासणी केली. त्यापैकी 188 जणांची अँटीजेन टेस्ट केल्या आहेत. गगनबावडा, भुदरगड तालुक्यात नव्या रूग्णांची नोंद झाली नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.

जिल्ह्यात बुधवारी सीपीआर, केअर सेंटरमध्ये 423 जणांची तपासणी केली. सध्या  34 हजार 724 रूग्ण उपचार घेत आहेत. शेंडा पार्क येथील लॅबमधून 240 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 219 निगेटिव्ह तर 18 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 208 रिपोर्ट आले. त्यापैकी 24 पॉझिटिव्ह आहेत.

जिल्ह्यात कोरोनाने 8 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सीपीआर हॉस्पिटलमध्ये   माणगाव चंदगड येथील 52 वर्षीय पुरूष, मुरूडे आजरा येथील 76 वर्षीय पुरूष,  संभाजीनगर कोल्हापूर येथील 43 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये शहापूर इचलकरंजी येथील 70 वर्षीय पुरूष, कबनूर हातकणंगले येथील 77 वर्षीय पुरूष आणि पंचवटी टॉकीज इचलकरंजी येथील 63 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात सारोळी गडहिंग्लज येथील 60 वर्षीय पुरूष आणि कोवाड चंदगड येथील 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. कोरोनाने आजपर्यत 1 हजार 777 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ग्रामीण भागात 765, नगरपालिका क्षेत्रात 331, महापालिका क्षेत्रात 352 तर अन्य  129 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 477 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 41 हजार 757 झाली आहे. आजरा 1, चंदगड 8, गडहिंग्लज 6, हातकणंगले 9, कागल 5, करवीर 9, पन्हाळा 4, राधानगरी 1, शाहूवाडी 8, शिरोळ 4 नगरपालिका क्षेत्रात 6, कोल्हापूर शहर 33 आणि अन्य 16 असे 110 रूग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.

Related Stories

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी मुदत वाढली

Abhijeet Shinde

राधानगरीच्या संकेतची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Abhijeet Shinde

इच्छूकांच्या डिजिटलवर महापालिकेचा हातोडा

Abhijeet Shinde

गाव गाड्यातली खळ्यावरची मळणी कालबाह्य

Abhijeet Shinde

असंघटित यंत्रमाग कामगारांसाठी घेण्यात आला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Abhijeet Shinde

युरिया व रासायनिक खतावरील लिकींग रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!