तरुण भारत

ईएसआयचे चार सेवा दवाखाने मंजूर

कागल, शिरोली, हातकणंगले, हलकर्णी एमआयडीसीतील कामगार, कर्मचाऱयांना लाभ

प्रतिनिधी / कोल्हापूर

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने कोल्हापूर जिल्ह्यात ईएसआयसीचे ( राज्य कामगार विमा कार्पोरेशन ) चार सेवा दवाखाने सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. कागल, शिरोली, हातकणंगले आणि हलकर्णी या चार औद्योगिक वसाहतीत (एमआयडीसी) हे सेवा दवाखाने सुरू होणार आहे. या सेवा दवाखान्यांचा चारही एमआयडीसीतील हजारो कर्मचारी, कामगारांना लाभ होणार आहे. दरम्यान, या दवाखान्यांसाठी जागांचा शोधही सुरू करण्यात आला आहे. ही माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.

औद्योगिक वसाहतीमध्ये ईएसआयसीकडे नोंद असलेल्या कर्मचाऱयांना वेळेत व त्यांच्या औद्योगिक वसाहतीच्याठिकाणी उपचार मिळावेत म्हणून चेंबर ऑफ कामर्स व जिह्यातील विविध औद्योगिक संघटना, असोसिएशन, कामगार युनियन यांनी खासदार संजय मंडलिक यांच्याकडे मागणी केली केली होती. त्यानुसार चार औद्योगिक वसाहतींमध्ये सेवा दवाखाने मंजूर झाल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले.
खासदार मंडलिक म्हणाले, वैद्यकीय सेवा आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार औद्योगिक वसाहतीत काम करणाऱया कामगारांना व त्यांच्यावर कुटुंबीयांना त्यांच्या रहिवास ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी औद्योगिक वसाहत कागल, औद्योगिक वसाहत शिरोली, औद्योगिक वसाहत हातकणंगले व औद्योगिक वसाहत हलकर्णी याठिकाणी ईएसआयचे सेवा दवाखाने सुरु करावेत, अशा मागणी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयात वेळोवेळी केली होती. त्यानुसार या चारही औद्योगिक वसाहतीमध्ये सेवा दवाखाने मंजूर झाले असून याठिकाणी तज्ञ डाक्टर्स व औषधे उपलब्ध असणार आहेत. या दवाखान्यांसाठी खासदार मंडलिक यांचे सहकारी चेंबर ऑफ कामर्सचे संचालक व हास्पिटल समन्वयक विज्ञान मुंडे यांनी खास प्रस्ताव तयार करुन विशेष पाठपुरावा केला होता.

कोल्हापुरातील रूग्णालयावरील ताण होणार कमी

येथील ताराबाई पार्कमध्ये केंद्र शासनाने कामगार, कर्मचाऱयांसाठी उभारलेल्या ईएसआय हॉस्पिटलचा लाभ जिल्ह्यातील सुमारे दीड-दोन लाख कामगार व त्यांच्या नातेवाईक यांच्यासह सुमारे पाच लाख रुग्णांना होतो. नवीन सुरू होणाऱया चार सेवा दवाखान्यांमुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सुविधा त्यांच्या औद्योगिक वसाहतीच्या परिसरात विनामोबदला मिळणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरच्या ईएसआय हॉस्पिटलवरील ताणही कमी होणार आहे.

Advertisements

सेवा दवाखान्यांसाठी जागांचा शोध सुरू

कोल्हापूर जिल्हयामध्ये शिरोली, जयसिगपूर-हातकणंगले,कागल,चंदगड-शिनोली-हलकर्णी-गडहिंग्लज या भागामध्ये महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गंत हे सेवादवाखाने सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी 150 ते 200 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेचा शोध सुरू आहे. इच्छुकांनी 4 नोव्हेंबरअखेर अर्ज करावा. यासाठी शर्तीचा व अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे, असे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. श्रीपाद भागवत यांनी कळवले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील बहुमान

औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांसाठी जास्त संख्येने सेवा दवाखाने सुरु करणारा कोल्हापूर जिल्हा हा देशातील पहिलाच जिल्हा बनला आहे.

Related Stories

कुंभोज येथे रोख रकमेसह देशी गाय गेली चोरीला

Sumit Tambekar

कोल्हापूर जिल्ह्यात ५९३ संस्थांचे `पुनश्च हरीओम’

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गॅस पाईपलाईन योजनेला महापालिकेचा हिरवा कंदील

Abhijeet Shinde

विद्यार्थीनींनी अडवली चंदगड आगारची बस

Abhijeet Shinde

‘गोकुळ’ दुध उत्पादकांच्या मालकीचा करणार : मंत्री हसन मुश्रीफ

Abhijeet Shinde

प्रियदर्शनी मोरेंना केलेल्या अरेरावीचा निषेध

Abhijeet Shinde
error: Content is protected !!