तरुण भारत

काही बाधितांची श्रवणशक्तीच संपवितोय कोरोना विषाणू

कोरोना विषाणू काही बाधितांच्या श्रवणशक्तीला हानी पोहोचवित असल्याचे आढळून आले आहे. एका अध्ययनानुसार ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूला अक्षम करण्याच्या स्थितीशी जोडणारे पहिले प्रकरण नोंद झाले आहे. या संभाव्य दुष्प्रभावाविषयी जागरुकता आवश्यकता आहे. परंतु असे का घडतेय याचे कारण अत्यंत स्पष्ट नसल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. बीएमजे केस रिपोर्ट्स नावाच्या नियतकालिकात प्रकाशित अध्ययनानुसार दम्याने पीडित एका 45 वर्षीय व्यक्तीचा प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. कोविड-19 वरील उपचारादरम्यान एका कानातील ऐकण्याची क्षमता अचानक कमी झाल्याने या व्यक्तीला ब्रिटनच्या रॉयल नॅशनल थ्रोट अँड इयर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते.

Related Stories

काबुलमध्ये राष्ट्रपती भवनाजवळ रॉकेट हल्ले

datta jadhav

पत्रकाराच्या अटकेसाठी विमान हायजॅक

datta jadhav

ऑरिगॉनमध्ये कोरोनाचे नवे रूप

datta jadhav

इस्राईलमध्ये धार्मिक उत्सवात चेंगराचेंगरी, 44 जणांचा मृत्यू

datta jadhav

पोर्टलँड हिंसेवरून अमेरिकेत राजकीय वाप्युद्ध

Patil_p

महामारीवर ऋतूचा प्रभाव नाही

Patil_p
error: Content is protected !!