तरुण भारत

महाराष्ट्रात 13 लाख पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / मुंबई :


महाराष्ट्रातून  मागील 24 तासात 19,517 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 13 लाख 16 हजार 769 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 84.71 % आहे. 


दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 10,552 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 15 लाख 54 हजार 389 वर पोहचली आहे. सध्या 1 लाख 96 हजार 288 रुग्ण उपचार घेत आहेत. बुधवारी दिवसभरात 158 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 40 हजार 859 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.63 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 78 लाख 38 हजार 318 नमुन्यांपैकी 19.83 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 23 लाख 80 हजार 957 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 23 हजार 176 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

Related Stories

सातारकरांना नाही राहिले कोरोनाचे भय

Patil_p

रस्त्यावर थुंकणाऱ्याला अटक

triratna

कोल्हापुरात कडकडीत लॉकडाऊन; पहा ही दृश्ये

Shankar_P

सातारा जिल्ह्यात 71 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यु, तर 115 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

triratna

सातारा जिह्यात कोरोना केअर सेंटर सुरु

Omkar B

एस. टी. महामंडळात दुसऱ्या ही दिवशी आढळला कोरोना पॉझिटिव्ह

triratna
error: Content is protected !!