तरुण भारत

ऍपलचा आयफोन-12 बाजारात दाखल

हाय स्पीड कार्यक्रमात सादरीकरण : सीईओ टीम कुक यांची उपस्थिती, बुकिंग सुविधा 23 ऑक्टोबरपासून

कॅलिफोर्निया : मागील काही दिवसांपासून प्रतिक्षेत असणारा ऍपलचा आयफोन 12 हा फोन अखेर कंपनीने सादर केला आहे. मंगळवारी रात्री कंपनीकडून कॅलिफोर्नियाच्या क्यूपर्टिनोमधील मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘हाय स्पीड’ कार्यक्रमात आयफोन 12 ची आवृत्ती लाँच करण्यात आली. 12 आवृत्तीमध्ये प्रामुख्याने आयफोन 12, आयफोन 12 मिनी, आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्स या मॉडेल्सचा समावेश आहे.

सदर कार्यक्रमात कंपनीने स्मार्ट होम पॉड स्पीकरचे सादरीकरण केलेले आहे. आयफोन 12 मिनी हा जगातील सर्वात पातळ आणि हलका 5 जी स्मार्टफोन म्हणून ओळखला जाणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या फोनच्या ऍडव्हान्स बुकिंगला 23 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती ऍपलचे सीईओ टीम कुक यांनी दिली आहे.

आयफोन 12 मध्ये 6.1 इंच सुपर रेटिना एक्सडीआर ओल्ड डिस्प्ले स्क्रीन   मिळणार आहे. तसेच रेझोल्यूशन 2532×1170 पिक्सल असून ऍल्यूमिनियम प्रेम फ्लॅटची साईटपट्टी आहे. नवीन आयफोनमध्ये 5 जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट सुविधा असून सोबत आयओएसलाही ऑप्टिमाइज्ड केले आहे. फोनमध्ये ए 14 बायोनिक चिप दिलेली आहे. कंपनीने सदर चिपचा वापर आयपॅड एअरमध्येही केला आहे. कंपनीने यावेळी दावा केला आहे, की नेटवर्कसह जास्तीत जास्त डाऊनलोड स्पीड 4 जीपीएसपर्यंत राहणार आहे. 64 जीबी, 128 जीबी आणि 265 जीबी स्टोरेजचे फोन उपलब्ध होणार आहेत. आयफोन 12 मधील विशेष सुविधा

­
आयफोन 12 चे फोन 6 मीटर खोल पाण्यात अर्धा तास राहिल्यास चिंता नाही

­
आयफोन 12 आवृत्तीचा ड्रॉप परफॉर्मन्स 4 पटीने आधुनिक

­
आयफोन 11 च्या तुलनेत अधिक मजबूत

­
मजबूत फोनच्या निर्मितीसाठी सिरेमिक शील्डचा वापर ऍपलचे 25 मॉडेल्स बाजारात

­
ऍपल कंपनीचा पहिला आयफोन 13 वर्षाअगोदर 9 जून 2007 मध्ये स्टीव्ह जॉब्स यांनी सादर केला होता.

­
सेल्फी कॅमेरा येण्यासाठी 4 वर्ष आणि डबल रिअर कॅमेरा येण्यास 10 वर्षाचा प्रवास करावा लागला आहे.

­
अँड्रॉइड स्मार्टफोनचे शेकडो पर्याय असतानाही प्रत्येक वर्षी दोन ते तीन मॉडेल्स बाजारात दाखल झालेत

आयफोन 12 ची भारतामधील किंमत

मॉडेलकिमत
64 जीबी स्टोरेज79,900 रुपये
128 जीबी स्टोरेज84,900 रुपये
256 जीबी स्टोरेज94,900 रुपये

Related Stories

अशोक लेलँडचा नवा ट्रक

Patil_p

एसीसीचा निव्वळ नफा 20 टक्क्यांनी वधारला

Patil_p

रेल्वेचे 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन शुन्यचे ध्येय

Patil_p

सीबीआयसीकडून 10,700 कोटीचा जीएसटी-सीमा शुल्क परतावा

Patil_p

ऍपलची स्मार्ट घडय़ाळे भारतात उपलब्ध

Patil_p

एचडीएफसी बँक : कर्ज-डिपॉझिटमध्ये वाढ

Patil_p
error: Content is protected !!