तरुण भारत

भारतातील कोरोनाबाधितांनी पार केला 73 लाखांचा टप्पा

  • मागील 24 तासात 67,708 नवे रुग्ण; 680 मृत्यू


ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


भारतातील कोरोनाबाधित रुग्णांनी 73 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशात मागील 24 तासात 67 हजार 708 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 680 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 73 लाख 07 हजार 098 वर पोहचली असून, मृतांची संख्या 1 लाख 11 हजार 266 एवढी आहे.


सध्या देशात 8 लाख 12 हजार 390 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 63 लाख 83 हजार 442 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


आतापर्यंत देशात 9 कोटी 12 लाख 26 हजार 305 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 11 लाख 36 हजार 183 रुग्णांच्या चाचण्या बुधवारी एका दिवसात करण्यात आली.

Related Stories

दिल्लीत दिवसभरात 1404 नवे कोरोना रुग्ण; 16 मृत्यू

pradnya p

मध्य प्रदेशात आता केवळ ‘या’ दिवशी असणार लॉक डाऊन

pradnya p

संशयित चिनी सैनिक ताब्यात

Patil_p

देशात रुग्णसंख्या 23 लाखांच्या पुढे

Patil_p

तृणमूल नेत्याकडून महिलेला मारहाण

Patil_p

अहमदाबादमध्ये विनामास्क फिरणाऱयांना तीन वर्ष कारावास

Patil_p
error: Content is protected !!