तरुण भारत

बेंगळूर: प्रश्नपत्रिका फुटल्याने बी.कॉमची परीक्षा पुढे ढकलली

बेंगळूर/प्रतिनिधी

बेंगळूर विद्यापीठात बीकॉम परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे बीकॉमच्या अंतिम वर्षाची परीक्षा शनिवारी १७ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे.

सोमवारी दुपारी दोन वाजता बी.कॉमची परीक्षा होणार होती. परंतु परीक्षेच्या काही तासापूर्वी पेपर फुटल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली. परीक्षेला बसलेल्या ७०० महाविद्यालयांमधील जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागला आहे. परीक्षेसाठी २०५ केंद्रे तयार केली गेली आहेत.

बेंगळूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. के. आर. वेणुगोपाल यांनी सोमवारी सकाळी सोशल मीडियावर पेपर फुटल्याची माहिती मिळाली. लीक झालेली प्रश्नपत्रिका प्रत्यक्षात जुळली तेव्हा पेपर फुटल्याची खात्री झाली. त्यानंतर परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्यात आली असे सांगितले.

प्रा. वेणुगोपाल यांनी परीक्षेच्या दिवशी सर्व परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पाठविली गेली. परंतु कुठूनही पेपर फुटू शकतो. याप्रकरणी सायबर क्राइम पोलीस तपास करत आहेत अशी माहिती दिली.

Advertisements

Related Stories

‘आरटी-पीसीआर चाचणी अहवाल उशिरा मिळणे धोकादायक’

Abhijeet Shinde

खासगी शिक्षक, प्राध्यापकांना खूशखबर

Amit Kulkarni

मंगळवारी राज्यात 15,223 जणांना लस

Amit Kulkarni

कर्नाटकात सोमवारी १,५०९ जणांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

कर्नाटक: शेतकरी आणि इतर संघटनांनी दिली कर्नाटक बंदची हाक

Abhijeet Shinde

राज्यात पॉझिटिव्हीटी दर 3.80 टक्के

Amit Kulkarni
error: Content is protected !!