तरुण भारत

भिंडे – मळकर्णे येथील जुना पाट कोसळण्याच्या स्थितीत

जलस्रोत खात्याने 2016 पासून तीन वेळा निविदा काढूनही नवीन पाटाचे काम नाही, बागायतदार विवंचनेत

वार्ताहर / काकोडा

Advertisements

सांगे मतदारसंघाच्या मळकर्णे पंचायत क्षेत्रातील भिंडे प्रभागातील प्रगतशील सुपारी व नारळ बागायतदारांना दरवषी पाणीपुरवठा करणाऱया पाटाची डागडुजी करण्यासाठी स्वतः पदरमोड करून व्यवस्था करावी लागते. जलस्रोत खात्याने 2016 सालापासून आजपर्यंत तीन वेळा या पाटासाठी निविदा काढूनही अद्याप हे काम झालेलेच नाही. यंदा तर मोठय़ा प्रमाणात पडलेल्या पावसामुळे पाटालगतच्या जमिनीची मोठय़ा प्रमाणात धूप झाली असून येथील जमीन पोकळ झाल्याने जुना पाट कोसळण्याच्या स्थितीत आहे. सदर पाट कोसळल्यास भिंडे वाडय़ावरील शेकडो एकर बागायतींवर पाण्याअभावी संकट कोसळणार आहे.

भिंडे गावात सुमारे 15 प्रगतशील सुपारी व नारळ बागायतदार असून या बागायतींत मोठय़ा प्रमाणात केळी, मिरी, मसाला व इतर अनेक आंतरपिके घेण्यात येतात. या सर्व बागायतींना वरील भागात असलेल्या तळी व झरीच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून पाटाची व्यवस्था आहे. मध्यंतरीच्या काळात सरकारतर्फे अर्ध्या पाटाचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र सदर पाट खूपच जुना असल्याने तो पूर्णता जीर्ण झाला आहे. त्यानंतर 2016 साली संपूर्ण पाटाचे नव्याने बांधकाम करण्यासाठी सुमारे 37 लाखांची निविदा काढण्यात आली होती. मात्र तीन वेळा निविदा निघूनही सदर पाटाचे काम न झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत.

दरवषी पावसाळा संपल्यानंतर सर्व बागायतदार मिळून पैसे गोळा करतात व श्रमदानाने या जुन्या पाटाची दुरुस्ती करून पाणीपुरवठय़ाची व्यवस्था करतात. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार चालू असून सुपारी गळती, माकडांचा उच्छाद व इतर अनेक कारणांस्तव नुकसानात असलेल्या बागायतदारांना यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. सध्या पाटाच्या जवळील माती मोठय़ा प्रमाणात वाहून गेल्याने पाट पूर्णपणे कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डोंगरमाथ्यावरील व येथील शेतातील पावसाच्या पाण्याचे लोट वाहून जाऊन येथे मोठा ओहोळ बनला आहे.

अभियंते, पंचांकडून पाहणी

या सर्व बागायतदारांनी मिळून स्थानिक पंच दीपक नाईक व रमेश मळीक यांच्यासह या भागाची पाहणी केली व त्वरित उपाययोजना न केल्यास येत्या वर्षापर्यंत पाट निश्चित कोसळण्याची भीती व्यक्त केली. सदर प्रकार लगेच सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांच्या कानी घातला असता त्यांनी त्वरित जलस्रोत खात्याच्या वरि÷ अभियंत्यांना घेऊन पाहणी करून तोडगा काढण्याचे आश्वासन बागायतदारांना दिले. त्यानुसार जलस्रोत खात्याचे कनि÷ अभियंता गावकर व आमदार गावकर यांचे बंधू असलेले पंच संदेश गावकर यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली. पाटालगतच्या जागेतील मातीची आणखी धूप होऊ नये यासाठी उपाययोजनांच्या कामाचे अंदाजपत्रक लवकरच तयार करू, असे आश्वासन अभियंता गावकर यांनी यावेळी दिले.

दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंतींची गरज

यासंदर्भात बोलताना बागायतदार प्रसन्न प्रभू यांनी सांगितले की, या ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी त्वरित दोन्ही बाजूंनी मोठय़ा संरक्षक भिंती बांधून काढण्याची नितांत गरज आहे. अन्यथा येत्या पावसाळय़ापर्यंत पाट संपूर्णपणे कोसळून बागायतींना पाण्याचे दुर्भिक्ष्य भासून बागायतदारांवर मोठे संकट कोसळेल. त्याचप्रमाणे नवीन पाटाचे बांधकाम न केल्याने एप्रिल व मे या दोन महिन्यांत पाण्याची समस्या निर्माण होते. पूर्वीचा पाट हा निकामी झाल्याने तसेच पाटात खेकडे सिमेंट फोडून खड्डे तयार करत असल्याने प्रत्येक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणी झिरपते. त्याचप्रमाणे डोंगर व शेतातील पावसाचे पाणी पाटातून वाहून जात असल्याने पाटात मोठय़ा प्रमाणात माती साचून पाट बुजत आहे. जलस्रोतमंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स, कृषिमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनीही या प्रकारात लक्ष घालावे, अशी मागणी बागायतदारांनी केली आहे.

Related Stories

अंगडी तांत्रिक महाविद्यालयात कार्यशाळा

Patil_p

केएसआरटीसी कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत

Patil_p

रामा हुलीकोतली यांचे कुस्तीत यश

Amit Kulkarni

संगीता बांदेकर-कुलकर्णी यांच्या संमिश्र गायनाचा आज कार्यक्रम

Amit Kulkarni

मिरचीचा ठसका झाला कमी

Patil_p

मंडोळी-हंगरगा रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

Patil_p
error: Content is protected !!