तरुण भारत

अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी बेंगळूर पोलिसांचा छापा

बेंगळूर/प्रतिनिधी

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या मुंबई येथील घरी बेंगळूर पोलिसांनी छापा टाकला आहे. दुपारी एक वाजता बेंगळूर पोलीस विवेकच्या घरी पोहोचले आणि त्यांनी झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. पोलीस विवेकचा मेहुणा आदित्य अल्वा याचा तपास करत आहेत. तो बेंगळूरमधील ड्रग्ज कनेक्शनमध्ये आरोपी आहे. आदित्य अल्वा हा दिवंगत मंत्री जीवनराज अल्वा यांचा मुलगा आहे.

आदित्य अल्वा याचा अमली पदार्थ प्रकरणात बेंगळूर पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणात कन्नड सिनेसृष्टीतील गायक, कलाकार यांचे कनेक्शन समोर आले आहे. सँडलवुड ड्रग प्रकरणातील १२ आरोपींमध्ये त्याचा समावेश असून सीसीबी पोलीस तपास करत आहेत. सीसीबी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य हा १२ नंबरचा आरोपी आहे. पोलिसांनी ड्रग प्रकरणाची चौकशी सुरू केली तेव्हापासून तो फरार होता.

बेंगळूर गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी विवेक ओबेरॉय हा आदित्य अल्वाचा नातेवाईक आहे. आदित्य हा विवेक ओबेरॉयच्या घरी लपला असावा अशी माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही न्यायालयातून वॉरंट मिळवले आणि केंद्रीय गुन्हे शाखेच्या पथकाने विवेकच्या घरी छापा टाकत झाडा झडती घेतली, अशी माहिती दिली.

काय आहे प्रकरण ?

कन्नड फिल्म इंडस्ट्रीत होणारे अमली पदार्थांचे सेवन आणि देवाण-घेवाण याविषयीच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सेंट्रल क्राइम ब्रांचने (सीसीबी) एका व्यक्तीला चित्रपट सृष्टीतील व्यक्तींना ड्रग्ज पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. या प्रकरणात कन्नड चित्रपटसृष्टीतील काही नावं समोर आली. त्यांनतर सीसीबी पोलिसांनी तपास गतिमान करत सुरुवातीला अभिनेत्री रागिणी द्विवेदीचा मित्र रवीशंकरला अटक करण्यात आली. रवीशंकरने चौकशीदरम्यान रागिणीचं नाव घेतलं. त्यानंतर रागिनीच्याही घरी छापे टाकत तिला अटक करण्यात आली. आता या प्रकरणात आणखी नावं समोर आली. नंतर अभिनेत्री संजना गलराणी हिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

Advertisements

Related Stories

कर्नाटक : आता मुख्यमंत्री बदलण्याची वेळ

Abhijeet Shinde

कर्नाटकात लवकरच एक लाख कोरोना चाचण्या होणारः मंत्री सुधाकर

Abhijeet Shinde

कर्नाटक: पक्ष बळकट करण्याची गरज : कुमारस्वामी

Abhijeet Shinde

कर्नाटक सरकारने नववर्ष साजरे करण्यावर घातले निर्बंध

Sumit Tambekar

कर्नाटकः ई-पास सहकार्य केल्याबद्दल पोलीस प्रमुखांकडून बेंगळूर येथील कंपनीचे कौतुक

Abhijeet Shinde

महाराष्ट्र शासनाची कर्नाटकला अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याची विनंती

Abhijeet Shinde
error: Content is protected !!