तरुण भारत

गुरुवारी 562 जण झाले कोरोनामुक्त

प्रतिनिधी/ बेळगाव

गुरुवारी बेळगाव शहर व जिल्हय़ातील 562 जण कोरोनामुक्त झाले आहेत. वेगवेगळय़ा इस्पितळातून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 20 हजार 927 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या 24 तासांत 166 नवे रुग्ण आढळले असून तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

एकूण बाधितांची संख्या 23 हजार 277 वर पोहोचली आहे. बेळगाव शहर व उपनगरांतील दोन व हिडकल येथील एक असे तिघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा मृतांचा सरकारी आकडा 323 वर पोहोचला आहे. प्रत्यक्षात हा आकडा मोठा आहे. सरकारी घोळामुळे वस्तुस्थिती लपविली जात आहे.

गुरुवारी बेळगाव व उपनगरांतील 36 व ग्रामीण भागातील 4 असे तालुक्मयातील 40 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमधील माहितीनुसार बाधितांचा आकडा गुरुवारी 303 वर पोहोचला आहे. जिह्यातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र मृत्यूचे प्रमाण घटले आहे.

हलगा, शिंदोळी, वाघवडे, भाग्यनगर, खासबाग, विनायकनगर, अजमनगर, राणी चन्नम्मानगर, रामतीर्थनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर, शहापूर, शास्त्राrनगर, भांदूर गल्ली-अनगोळ, बिम्स हॉस्पिटल, गुडस्शेड रोड, मुत्यानट्टी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एकाच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.

दसरा, दिवाळी सणामुळे बाधितांच्या संख्येत वाढ होण्याची भिती आहे. त्यामुळे सण साजरा करताना सरकारी नियमांचे पालन करा. केवळ लॉकडाऊन उठविण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव सुरूच आहे. त्यामुळे प्रत्येकाने फैलाव रोखण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर याचे काटेकोर पालन करण्याची सूचना वारंवार दिली जात आहे.

Related Stories

शारदोत्सव आयोजित लेखन कार्यशाळेला प्रारंभ

Patil_p

आयसीएमआर, बिम्स-किम्समध्ये समन्वय करार

Amit Kulkarni

कोगनोळीजवळ हरणाची शिंगे जप्त

Patil_p

यशवंतपूर- पंढरपूर, म्हैसूर-निजामुद्दीन साप्ताहिक एक्स्प्रेस धावणार

Amit Kulkarni

मिश्रा यांची पत्रकार परिषदेत माहिती

Omkar B

पोलिसांकडून अडवणूक; कामगारांचे आंदोलन

Amit Kulkarni
error: Content is protected !!