तरुण भारत

बागवान गल्ली येथे लहान मुलांवर बॅटने हल्ला

मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर

बेळगाव

Advertisements

क्षुल्लक कारणावरून दोन लहान मुलांवर बॅटने हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी बागवान गल्ली परिसरात ही घटना घडली असून यासंबंधी मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी पुढील तपास करीत आहेत.

नजीरअहमद शेख यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे. मतीन शेख, साजीद शेख (दोघेही रा. इनामदार चाळ) या दोघा जणांवर भा.दं.वि. 307, 427, 504, 506 सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महम्मद कैफ (वय 16), महम्मद नकीब (वय 14) अशी जखमी मुलांची नावे आहेत.

या दोन मुलांची आई घरकामासाठी जात होती. दोन वर्षांपूर्वी तिने मतीन शेख यांच्या घरी काम करणे बंद केले होते. त्यामुळे तिच्यावर राग होता. लहान मुलांच्या भांडणानंतर या दोन मुलांवर बॅटने हल्ला करण्यात आला आहे. मार्केट पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

Related Stories

जमखंडी येथे रक्तदान शिबिर

Patil_p

स्वच्छतेसाठी प्रत्येक वॉर्डात कमिटी

Amit Kulkarni

राणी चन्नम्मा एक्स्प्रेस आजपासून नव्या रुपात

Amit Kulkarni

सलून चालकांना दिले ऑटोमॅटिक सॅनिटायझर

Patil_p

फिलॅटली ब्युरोमुळे बेळगावचा इतिहास सर्वदूर पसरेल!

Omkar B

जिल्हय़ात सोमवारी 399 जणांनी केली कोरोनावर मात

Amit Kulkarni
error: Content is protected !!