तरुण भारत

घर झाडण्यासाठी येऊन मंगळसूत्र पळविणाऱया महिलेला अटक

प्रतिनिधी/ बेळगाव

नवरात्रोत्सवानिमित्त घराची झाडलोट करण्यासाठी आलेल्या एका महिलेने तिजोरीतील 31 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र पळविल्याची घटना शास्त्राrनगर, पाचवा क्रॉस येथे घडली आहे. याप्रकरणी खडेबाजार पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.

Advertisements

सुनीता वसंत मंजलकर (वय 28, रा. मारुतीनगर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. सुनीताने दोन दिवसांपूर्वी शास्त्राrनगर येथे चोरलेले मंगळसूत्र पोलिसांनी जप्त केले आहे.

13 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे. अनुराधा अमित राच यांनी खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. सुनीता ही महिला झाडलोट करण्यासाठी म्हणून आली होती. घरमालकांची नजर चुकवून तिने तिजोरीतील मंगळसूत्र चोरले होते. घरी जाताना उद्या आपण येणार नाही, असे सांगून गेली होती.

14 ऑक्टोबर रोजी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. कपाटात ठेवलेले मंगळसूत्र गायब झाल्याचे पाहून सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. 

Related Stories

बी.बी.सी.बेकरी यांच्याकडे आता चॉकलेट पानीपुरीला सुरुवात

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. सदस्यांची ‘तरुण भारत’ला सदिच्छा भेट

Patil_p

डिझेल टँकरमधून बेकायदा दारू वाहतूक

Amit Kulkarni

ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ.देवयानी देशपांडे यांचे निधन

Patil_p

कर्नाटक: अपेक्षित निकाल का मिळत नाहीत, मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना सवाल

Abhijeet Shinde

तिगडी ग्रा.पं.अध्यक्षाचा भीषण खून

Patil_p
error: Content is protected !!