तरुण भारत

फुटबॉल प्रशिक्षक खलिद जमिल यांना कोरोनाची लागण

वृत्तसंस्था/ पणजी

इंडियन सुपरलिग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया नॉर्थईस्ट युनायटेड एफसी संघाचे साहाय्यक प्रशिक्षक खलिद जमिल यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements

खलिद जमील यांना एक आठवडय़ापूर्वीच कोरोनाची बाधा झाली होती. त्यांची कोरोना चाचणी घेतल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने त्यांना काही दिवसांसाठी होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणा न झाल्याने त्यांची रुग्णालयात रवानगी करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार चालू असल्याची माहिती नॉर्थईस्ट युनायटेड एफसी संघाच्या वरि÷ अधिकाऱयाने दिली. या संघातील किमान तीन फुटबॉलपटूंना कोरोनाची बाधा यापूर्वीच झाल्याचे सांगण्यात आले होते. ऐझवाल एफसी संघाने यापूर्वी आयलिग स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी खलिद जमील यांचे त्या संघाला मार्गदर्शन लाभले होते. आपल्या प्रशिक्षक पदाच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी कोलकात्याच्या बलाढय़ मोहन बगान आणि ईस्ट बंगाल या संघांनाही गेल्या वषीच्या इंडियन सुपरलिग हंगामात शेवटच्या तीन सामन्यांसाठी मार्गदर्शन केले होते. सध्या नॉर्थईस्ट युनायटेड संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी गेरार्द नस यांच्यावर असून खलिद जमिल यांचे त्यांना साहाय्य मिळत होते. खलिद जमिल यांना किमान 14 दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रहावे लागेल, असे सांगण्यात आले. गेल्या 24 तासांच्या कालावधीत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे या क्लबच्या व्यवस्थापकाने सांगितले.

Related Stories

टोकियो ऑलिंपिकमध्ये बजरंगला कांस्यपदक

Patil_p

6 चेंडू…6 दिशा-उपदिशा अन् 6 षटकार!

Amit Kulkarni

ऑलिंपिक मिशनसाठी ऍथलीटस्ना निधी मंजूर

Patil_p

चीनमधील सहा फुटबॉलपटूंवर बंदी

Patil_p

भारतीय खेळाडूंनी केला कसोटीचा सराव

Patil_p

टोकियो ऑलिंपिकमधून बेरेटेनीची माघार

Patil_p
error: Content is protected !!