तरुण भारत

क्रीडा पत्रकार किशोर भिमानी कालवश

वृत्तसंस्था/ कोलकाता

भारतीय क्रीडा क्षेत्रातील वयस्कर क्रीडा पत्रकार आणि क्रिकेट समालोचक किशोर भिमानी यांचे गुरुवारी वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी रिटा आणि मुलगा गौतम असा परिवार आहे.

Advertisements

काही दिवसांपूर्वी त्यांना मेंदू विकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय इलाज सुरू होता. पण गुरुवारी त्यांचे निधन झाले. 1980 च्या दशकामध्ये किशोर भिमानी हे प्रख्यात क्रिकेट समालोचक म्हणून गाजले होते. इंग्रजी भाषेत क्रिकेटचे समालोचन करताना त्यांच्या आवाजाची ओळख अनेक क्रिकेटशौकिनांना झाली होती. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला, त्यावेळच्या सामन्यात भिमानी यांनी आपल्या क्रिकेट समालोचनात गावसकरांचे कौतुक केले होते. बंगाल क्रिकेट संघटनेतर्फे भिमानी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. द स्टेट्समन या इंग्रजी दैनिकामध्ये त्यांनी बरीच वर्षे क्रीडा विषयावर स्तंभलेखन केले होते. 1978 ते 1980 या कालावधीत ते कोलकाता क्रीडा पत्रकार क्लबचे अध्यक्ष होते.

Related Stories

स्विटोलिना तिसऱया फेरीत, प्लिसकोव्हा पराभूत

Patil_p

जोकोव्हिचचे वर्षअखेरचे अग्रस्थान निश्चित

Patil_p

नदाल, सित्सिपस, प्लिस्कोव्हा, कॅनेपी तिसऱया फेरीत

Amit Kulkarni

चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये चेल्सीला विजेतेपद

Patil_p

साबा करीम दिल्ली कॅपिटल्सचे टॅलेंट सर्च प्रमुख

Patil_p

मनु भाकरच्या प्रशिक्षण केंद्रात बदल

Patil_p
error: Content is protected !!