तरुण भारत

किर्गिझस्तानचे अध्यक्ष सूरोनबाय जीनबेकोव यांचा राजीनामा

ऑनलाईन टीम / बिश्‍केक : 

किर्गिझस्तानमध्ये 4 ऑक्टोबरला झालेल्या संसदीय निवडणुकांनंतर देशभरात उसळलेला जनक्षोभ संपुष्टात आणण्यासाठी अध्यक्ष सूरोनबाय जीनबेकोव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

Advertisements

किर्गिझस्तानमध्ये संसदीय निवडणुकीत सरकारच्या बाजूच्या पक्षांनाच बहुमत मिळाल्याने निवडणुकीत मतांची खरेदी आणि अन्य गैरप्रकार झाले असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर विरोधकांनी सरकारी इमारतींवर कब्जा करत तीव्र आंदोलन छेडले. आंदोलकांनी काही ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळही केली. 

राजकीय विरोधकांकडून जीनबेकोव यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. त्यानंतर जीनबेकोव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. देशात शांतता, अखंडता आणि सौहार्द कायम राहणे महत्वाचे आहे. त्यापेक्षा अध्यक्षपद महत्वाचे नसल्याचे जीनबेकोव यांनी म्हटले आहे.

Related Stories

चालती-फिरती ऑटोग्राफ डायरी

Patil_p

भाज्या पाहताच होते घामाघुम

Patil_p

इंडोनेशियातील सिनाबुंग ज्वालामुखीमध्ये विस्फोट

Patil_p

C-17 विमानाच्या चाकांवर मानवी मृतदेहाचे अवशेष

datta jadhav

ट्रम्प जेवणार सोन्याच्या ताटात, चहासाठी चांदीचा टी सेट

tarunbharat

4 कान असणारे अनोखे मांजर

Patil_p
error: Content is protected !!