तरुण भारत

स्टार्टअप क्षेत्रात 7.5 लाख रोजगार निर्मिती ?

स्टार्टअपमधील स्थितीत आर्थिक सुधारणेचे चित्र : एका अहवालामधून माहिती स्पष्ट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

देशातील स्टार्टअप क्षेत्रातील स्थिती काही प्रमाणात मागील काही दिवसांपासून  डळमळीत झाल्याचे दिसून येत होती. परंतु सध्या काही प्रमाणात यामध्ये सुधारणा होण्यास प्रारंभ होत असल्याचे संकेत आहेत. यामुळे चालू वर्षाच्या अंतिम क्षणापर्यंत सदरचे क्षेत्र 7.5 लाख रोजगार देईल, अशी माहिती ग्लोबल मॅनेजमेंट व स्ट्रेट्जी कन्सल्टिंग फर्म जिनोवसोबत करण्यात आलेल्या कराराअंतर्गत टाय दिल्ली-एनसीआरला देण्यात आली आहे.

सप्टेंबर 2020 च्या तिमाहीत एकूण गुंतवणूक आणि स्टार्टअपमधील खासगी गुंतवणूक या दोन्हीमधील स्थिती सध्या कोविड19 च्या अगोदरच्या स्तरावर पोहोचली आहे. यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जवळपास 26 ते 28 लाख रोजगार निर्मिती होण्याचा दाट अंदाज आहे. 

उपलब्ध अहवालानुसार भारतीय स्टार्टअप कोविडच्या दरम्यान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यामुळे अपेक्षा आहे, की चालू वर्षाच्या अंतिम दिवसांपर्यंत भारतामध्ये 8 स्टार्टअप युनिकॉर्न बनणार असल्याचा विश्वास टाय दिल्ली-एनसीआरचे अध्यक्ष रंजन आनंदन यांनी व्यक्त केला आहे.

डिजिटलसंबंधीच्या सेगमेंटमध्ये सुधारणा

डिजिटलवर आधारीत असणाऱया सेगमेंटमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये गुंतवणुकीत मजबूत स्थिती होत आहे. कारण भारतीय युनिकॉर्नमध्ये 2020 आणि 2021 मध्ये सलगची वाढ राहिली आहे. भारतात 2025 पर्यंत 100 युनिकॉर्न प्राप्त करण्याचे ध्येय आहे. कोरोना संकटात काही स्टार्टअप बंद झाले आहेत, तर काहींच्याकडून रोजगार निर्मिती केली जात असल्याचे चित्र निर्माण होत असल्याचे जिनोवचे सीईओ नटराजन यांनी म्हटले आहे.

Related Stories

ओएलक्सकडून 250 जणांची कपात

Patil_p

थेट ग्राहकांपर्यंत ब्रँड पोहोचविणे कार्य तेजीत

Patil_p

कर्मचाऱयांच्या लसीकरणासाठी कंपन्यांचा आशादायी पुढाकार

Patil_p

चौथ्या सत्रात सेन्सेक्स 958 अंकांवर झेपावला

Amit Kulkarni

सेलमधील 10 टक्के हिस्सेदारी विकणार

Patil_p

विदेशी गुंतवणूकदारांनी 20,574 कोटी गुंतवले

Patil_p
error: Content is protected !!