तरुण भारत

कर्नाटकात गुरुवारी ८ हजाराहून अधिक रुग्णांची भर

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकमधील कोरोनाचा वेग थांबता थांबत नाही. गुरुवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण ८,४७७ नवीन कोरोना प्रकरणांची नोंद झाली आहे. नेहमीप्रमाणे बेंगळूरमध्ये सर्वाधिक रुग्णांची भर पडली आहे. गुरुवारी बेंगळूरमध्ये ३,७८८ रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्याचवेळी घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या ८,८४१ इतकी होती. राज्यात गुरुवारी एकूण ८५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४५ जण बेंगळूर मधील आहेत. राज्यात कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत १०,२८३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात गुरुवारी कोरोनाची एकूण सक्रिय रुग्णसंख्या ११३५३८ होती. तर सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या राजधानी बेंगळूरमध्ये असून ती ६५२६८ इतकी आहे.

बेंगळूर शहरी जिल्ह्यात गुरुवारी ३७८८ रुग्णांची भर पडली तर ३,५२० रुग्ण घरी परतलेत. आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील ३,४६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

केएसआरटीसीची १० सप्टेंबरपासून बेंगळूर ते पणजी नवीन सेवा

Shankar_P

कर्नाटक: मंगळवारी ६ हजाराहून अधिक रुग्णांची भर

Shankar_P

कर्नाटक: काँग्रेसचे उमेदवार टी. बी. जयचंद्र यांचा उमेदवारी अर्ज दाखल

triratna

बेंगळूर: सीसीबीचे रागिणीला हजर राहण्याचे आदेश

triratna

कर्नाटक: राज्यातील १५० औद्योगिक प्रशिक्षण संस्था जागतिक दर्जाच्या होणार

Shankar_P

कर्नाटकचे माजी डीजीपी टी. श्रीनिवासुलू यांचे निधन

Shankar_P
error: Content is protected !!