तरुण भारत

ईपीएफओची व्हॉट्सऍप हेल्पलाईन

कर्मचाऱयांच्या निवृत्ती वेतनासह अन्य समस्या सोडविणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफओ)शी संबंधीत असणाऱया सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आता व्हॉटसऍपची सुविधा उपलब्ध होणार आहे.  ईपीएफओकडून व्हॉटसऍप हेल्पलाईन सेवेचे लाँचिंग नुकतेच करण्यात आले आहे.

 कर्मचाऱयांची निवृत्ती, काढलेली पीएफमधील रक्कम यासह अन्य प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही सेवा सादर करण्यात आल्याचे कामगार मंत्रालयाने नुकतेच सांगितले आहे. ईपीएफओने या प्लॅटफॉर्मसह ईपीएफआयजीएमएस पोर्टल, सीपीजीएएमएस, सोशल मीडीयामध्ये फेसबुक व ट्विटर आणि 24 बाय 7 कॉल सेंटर आदींच्या मदतीने संबंधीत तक्रारी दाखल करण्यासाठी इपीएफओने उत्तम अशी सुविधा आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे.

व्हॉट्सऍपला वाढती पसंती

सध्या सोशल मीडियातील सर्वाधिक वापरात असणारे ऍप म्हणून व्हॉट्सऍपची ओळख बाजारात आहे. व्हॉटस्ऍपचा ईपीएफओच्या सदस्यांना लाभ होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांच्या शंकांचे निरसन व्हॉटस्ऍपच्या माध्यमातून होणार आहे.

Related Stories

मारुती आल्टोच्या विक्रीचा आकडा 40 लाखाच्या घरात

Patil_p

‘आर्सेलर’च्या सीईओपदी आदित्यची वर्णी

Patil_p

अदानींची 29 हजार कोटींच्या आयपीओसाठी मोठी योजना

Amit Kulkarni

एल अँड टीला मिळाले कंत्राट

Patil_p

सॅमसंगचे नवे फ्रिज दाखल

Patil_p

टेगा इंडस्ट्रीचा येणार आयपीओ

Patil_p
error: Content is protected !!