तरुण भारत

खोची येथील श्री.भैरवनाथ मंदिरातील नवरात्रोत्सव रद्द


खोची/ वार्ताहर


संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकातील भाविकांचे आराध्य दैवत व खोची ता.हातकणंगले येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत,जागृत देवस्थान श्री.भैरवनाथ मंदिरातील नवरात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे.असे खोची ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
कोरोनाच्या वाढत्या संक्रमानामूळे खोची येथील श्री.भैरवनाथ देवस्थान मंदिर परीसरातील उत्सवानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करून कोरोनामुळे होणारे संक्रमण टाळावे,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

श्री.भैरवनाथ मंदिर प्रशासन निर्णयानुसार बंद ठेवण्याचे आदेश आहेत.तरी श्री.भैरवनाथ मंदिर नवरात्रोत्सव काळात भाविकांसाठी बंद राहणार आहे.यंदाचा नवरात्रोत्सव लोक सहभाग शिवाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.प्रथेप्रमाणे नवरात्रोत्सवात होणारे सर्व विधी करणेत येणार आहेत. श्री.भैरवनाथ देवाची पूजा, आरती,पालखी प्रदक्षिणा या कार्यक्रमांना भाविकांना उपस्थित राहता येणार नाही.असे कळविणेत आले आहे.

धनगर समाजाची बिरदेव देवाची पालखी पण मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्यात येणार आहे. नवरात्र उत्सवानिमित्त होणारे सर्व विधी,कार्यक्रम शासन आदेशानुसार संपन्न करण्यासाठी भैरवनाथ व बिरदेव देवस्थान व्यवस्थापनाला कळविण्यात आले अाहे.तसेच पेठ वडगांव पोलीस ठाणेस ग्रामपंचायत प्रशासनाने पत्र देवून नवरात्र उत्सव,दसरा सोहळा यासाठी बंदोबस्ताची मागणी केली आहे.अशी माहिती खोची ग्रामपंचायतीचे प्रशासक व्ही. एम.पाटील व ग्रामविकास अधिकारी आर.एस.मगदूम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Related Stories

वाशिम जिल्हा ग्रीनझोन मध्येच राहणेसाठी प्रयत्नशील – पालकमंत्री शंभूराज देसाई

Shankar_P

महाराष्ट्रात कन्टोनमेंट झोनबाहेर वॉटर स्पोर्ट्स, पर्यटन स्थळांना परवानगी

pradnya p

कोल्हापूर : पेठ वडगाव येथील नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह

triratna

चिंताजनक : नागपूरमध्ये दिवसभरात 60 मृत्यू, 3,630 नवे रुग्ण

pradnya p

कोल्हापूर : टाकळीवाडीनजीक कर्नाटक बनावटीच्या दारु जप्त

Shankar_P

गोडोलीकरांना नव्या संसर्गाची धास्ती

triratna
error: Content is protected !!