तरुण भारत

जन्मताच या मुलीने वेधले जगाचे लक्ष

कोरोना विषाणू महामारीपासून वाचण्याचा केवळ एकच मार्ग आहे खबरदारी. मागील 10 महिन्यांमध्ये भविष्य चांगले होण्याची अपेक्षा जागविणाऱया फारच कमी गोष्टी घडल्या आहेत. परंतु अशीच एक गोष्ट घडली असून त्याचे समाजमाध्यमांवर प्रदर्शनही झाले आहे. केवळ काही सेकंदांपूर्वी जगात आलेल्या मुलीने केलेल्या कृत्याला जग एक संकेताप्रमाणे पाहत आहे. या नवजाताचे पहिले छायाचित्र प्रसारित झाले आहे. स्वतःच्या डॉक्टरचा मास्क खेचणाऱया या मुलीच्या छायाचित्राने कोरोनामुक्तीचा क्षण नजीक आल्याची अपेक्षा जग करू लागला आहे.

युएईतील एका गायनॉकॉलिस्टने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर हे छायाचित्र प्रसारित केले आहे. ‘आम्हा सर्वांना एक संकेत हवा की आम्ही लवकरच स्वतःचा मास्क हटविणार आहोत’ असे त्यांनी छायाचित्रासोबत लिहिले आहे. हे छायाचित्र आता समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणावर पसंती मिळवत आहे.

Advertisements

या छायाचित्रात उत्तम भविष्याची अपेक्षा दिसून येते असे काही जणांनी मत व्यक्त केले आहे. याला ‘2020 चे छायाचित्र’ घोषित केले जावे अशी प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

उत्खननात सापडलं 1000 वर्षे जुनं अंड

Patil_p

बहुविवाहामुळे तालिबान त्रस्त

Patil_p

कर्करोगाच्या रुग्णाकरता रेस्टॉरंटमालकाचा 850 किलोमीटरचा प्रवास

Patil_p

घरातही मुलांना घातलं जातेय हेल्मेट

Patil_p

ऍस्ट्राझेनेका लसीबाबत ऑस्ट्रेलियात वाढली चिंता

Amit Kulkarni

बसवण्यासाठी 200 कोटी, हटविण्यासाठी 150 कोटी

Patil_p
error: Content is protected !!