तरुण भारत

कोरोना ‘पॉझिटिव्ह’ वृत्त : धुम्रपान सोडणारे वाढले

2020 हे वर्ष लवकरात लवकर संपावे अशी प्रार्थना बरेच जण करत असतील. एका मागोमाग एक संकटाच्या वृत्तांदरम्यान काही चांगलेही गवसणार का हा प्रश्न आहे. परंतु नाण्याला दोन बाजू असतात. काही वाईट असेल तर काही चांगलेही असणारच.

सीएल स्मोकिंग टूलकिटच्या अध्ययनानुसार यंदा परस्परांना भेटणे आणि पार्टी यासारख्या हालचाली जवळपास नसल्यातच जमा आहेत आणि यंदा तंबाखूच्या उत्पादनांची विक्रीही कमी झाली आहे. कोविड महामारीपासून वाचण्यासाठी लोकांनी इम्युनिटी मजबूत करण्याकरता सिगारेट किंवा विडी सेवन कमी केले आहे. सर्वेक्षणानुसार फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये स्मोकरांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

Advertisements

2019 मध्ये 16.2 टक्के जण धूम्रपान सोडू इच्छित होते, तर 2020 मध्ये आतापर्यंत 23.2 टक्के लोकांनी धूम्रपान सोडण्याचा विचार चालविला आहे. 2008 पासून अशाप्रकारचे सर्वेक्षण केले जात आहे. परंतु धूम्रपान सोडण्याचा विचार यंदाच सर्वाधिक लोकांच्या मनात दिसून आला आहे.

ब्रिटनमध्ये सुमारे 10 लाख लोकांनी धूम्रपान सोडले आहे. धूम्रपानविरोधी प्रचारापेक्षा जगभरातील कोरोनाच्या फैलावाने हा बदल घडवून आणल्याचे सर्वेक्षकांनी म्हटले आहे. टाळेबंदीमुळे मार्चपासूनच अनेक देशांमधील जनजीवन जवळपास ठप्प झाले. सामाजिक कार्यक्रम जवळपास नसल्यातच जमा आहेत, हिंडणे, प्रवास इत्यादी प्रकारही मर्यादित झाले आहेत. लोक आरोग्यासंबंधी अधिक सजग राहिले आहेत. जनजीवन सुरळीत होईपर्यंत धूम्रपानविरोधी मोहीम सुरूच ठेवणार असल्यचे अँटी-स्मोकिंग संस्थांचे म्हणणे आहे.

Related Stories

तरुणांचा राजीनामा, अनुभवी वृद्धांना संधी

Patil_p

तालिबानकडून घराघरातून मुलींचा शोध

Patil_p

कॅनडा : बंदूकधाऱ्याकडून बेछूट गोळीबार, 16 जणांचा मृत्यू

prashant_c

स्वित्झर्लंड चिंताग्रस्त

Patil_p

युरोपमध्ये दहशत

Patil_p

सुलेमानीच्या हत्येत इस्रायलचाही हात

Patil_p
error: Content is protected !!