तरुण भारत

आयआयटी प्रकल्पास ‘एनओसी’ नाकारण्याच्या निर्णयास आव्हान

पंचायत संचालकांसमोर आज सुनावणी

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

गुळेली येथील नियोजित आयआयटी प्रकल्पाच्या कुंपणास ना हरकत दाखला (एनओसी) नाकारण्याच्या गुळेली पंचायतीच्या निर्णयास सरकारने अर्थात आयआयटी संचालकांनी आव्हान दिले असून त्यावर पंचायत संचालकांसमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सरकार तेथे आयआयटी करण्यास हट्टाला पेटल्याचे दिसत असून हे आव्हान पंचायत मंडळाच्या निर्णयावर गदा आणणारे ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पंचायत मंडळाचा आवाज दाबून टाकण्याचा हा प्रकार असून पंचायत संचालक आता काय निकाल देतात, त्यावर गुळेली आयआयटीचे भवितव्य ठरणार आहे.

दरम्यान, गुळेली ग्रामस्थांनी या प्रकरणात हस्तक्षेप अर्ज सादर केला असून त्यात पक्षकार करण्याची विनंती पंचायत संचालकांकडे केली असून ती मान्य झाली आहे. गुळेली पंचायतीने मागील आठवडय़ात आयआयटी प्रकल्पास तसेच कुंपणास अनुमती नाकारली होती. त्यामुळे सरकार संतप्त झाले असून त्यास आव्हान देण्याचे निर्देश आयआयटी संचालकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार हे आव्हान देण्यात आले आहे. त्यावर आज शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पंचायत संचालक पंचायतीच्या बाजूने की सरकारच्या बाजूने निर्णय देतात त्याकडे तेथील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Stories

चाचणीनंतर लगेचच मिळणार औषधोपचार

Amit Kulkarni

राज्यात आतापर्यंत 70 इंच पावसाची नोंद

Patil_p

निरंकाल येथील जीर्ण झाडामुळे धोका

Amit Kulkarni

रेल्वेच्या पार्सल एक्सप्रेस रेलगाडीला चांगला प्रतिसाद

Omkar B

सत्ता मिळाली, आता रंगणार नगराध्यक्षपदासाठी चढाओढ

Amit Kulkarni

फेडरेशनला उच्चस्तरावर नेण्यासाठी ग्राहकांनी साथ द्यावी

Amit Kulkarni
error: Content is protected !!