तरुण भारत

पालिका कर्मचाऱयांना सानुग्रह अनुदान द्या

प्रतिनिधी/ सातारा

सातारा नगरपालिकेमधील अधिकारी, कर्मचारी,  प्राथमिक शिक्षकांना  प्रत्येकी रु. 20 हजार रुपये व ठेकेदारी पद्धतीने काम करणाया कर्मचायांना प्रत्येकी  10हजार रुपये दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने नगराध्यक्षा माधवी कदम, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Advertisements

दुबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर,जागतिक महामारीच्या परिस्थितीतही पालिका कर्मचायांनी रात्रंदिवस काम केले आहे. अनेक कर्मचारी कोरोना बाधित होऊनही सातारा शहराचा कामाचा गाडा थांबला नाही.महाराष्ट्रात मोठय़ा उत्साहाने साजरा होणारा सण दिपावली हा नोव्हेंबर महिन्यात येऊ घातला आहे.दरवर्षी नगरपालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांना दिपावलीसाठी सानुग्रह अनुदान देण्याची अखंड परंपरा सुरु आहे.सातारा पालिकेमधील अधिकारी व कर्मचायांची कार्यक्षमता व प्रगतीचा आलेख चांगला असून करवसुली, आरोग्य, पाणीपुरवठा, विद्युत, निवडणूक शाखा, जन्म-मृत्यू, आस्थापना, वृक्ष अशा सर्व विभागात प्रामाणिकपणे काम करीत आहेत.पालिकेच्या प्राथमिक शिक्षकांनी कोरोनाच्या परिस्थितीत घर टू घर सर्व्हे, प्रतिबंधित क्षेत्रात डय़ुटी, माझे कुटुंब, माझी जबाबदारी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला होता.नगरपरिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना वरीलप्रमाणेच सानुग्रह अनुदान द्यावे, अन्यथा दि.22 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणेत येईल,याची प्रशासनाने नोंद घ्यावी,असा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

आरक्षण रद्दचे संतप्त पडसाद

Amit Kulkarni

महाराष्ट्र : ऊर्जामंत्री नितीन राऊत कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

भिवंडी : एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग

Rohan_P

आतंरराष्ट्रीय करप्रणाली परीक्षेत उचगावचा रजत पोवार भारतात पहिला

triratna

जिल्हा रुग्णालयातल्या महिला सफाई कामगारास कोरोनाची बाधा

Patil_p

कोरोना संपला नाही काळजी घ्या

Patil_p
error: Content is protected !!